Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयव्हीएफ पद्धतीने दोन मुलांना जन्म दिलेल्या मातेनं, नैराश्यातून दोन्ही मुलांना पाण्याच्या टाकीत टाकून ठार मारलंय. त्यानंतर त्या मातेने देखील त्याच टाकीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला मात्र दोन्ही मुलांचे प्राण मात्र वाचवता आले नाहीत.
‘कर्जत’मधील फोडाफोडी रोहित पवारांच्या जिव्हारी; म्हणाले, “आता तरी राम शिंदेंनी..”
ही घटना काल (9 एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या महिलेचे नाव प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय ३५, रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, मूळ रा. मिरजवाडी, ता. आष्टी) असे आहे. या प्रकरणी प्रतिभाच्या भावाने, प्रल्हाद लक्ष्मण गोंडे यांनी लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
व्यापार युद्ध भडकणार! अमेरिकेकडून चीनवर मोठा टॅरिफ बॉम्ब; 9 एप्रिलपासून 104 टक्के आयात शुल्क
पोलीसांच्या माहितीप्रमाणे प्रतिभा मोहिते यांचा विवाह होऊन १० वर्षे झाली होती. नैसर्गिक पद्धतीने मूल न झाल्याने त्यांनी आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्राने गर्भधारणा केली होती. प्रतिभा आणि तिची मुलं दोघंही गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. याच नैराश्याने ग्रस्त होऊन प्रतिभा यांनी आपल्या घरातील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत मुलांना टाकलं आणि स्वतःही उडी घेतली.
रोहित पवारांना अविश्वास प्रस्ताव मान्य, त्यांनी शब्द पाळला नाही; राम शिंदेंचा हल्लाबोल
शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तिला वाचवले, मात्र दोन्ही निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक अडचणीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, या घटनेने पुन्हा एकदा सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.