Pune News : पुणे विद्यापीठातील ललित केंद्रातील (Pune News) विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट नावाच्या नाटकात या कलाकरांचे वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नाटकावरून काल मोठा राडा झाला. नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात आता मोठी अपडेट मिळाली आहे. पुणे पोलिसांनी ललित कला केंद्राच्या प्रमुखांसह सहा जणांना अटक केली आहे.
पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्यावतीने जब वी मेट नावाच्या नाटकाच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकात काही विद्यार्थी काम करणार होते. परंतु, या नाटकावरून मोठा वाद निर्माण झाला. या नाटकात आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याचा दावा करत नाटक बंद पाडण्यात आले, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतने सांगण्यात आले होते. या घटनेचे सोशल मीडियावरही तीव्र पडसाद उमटले.
पुणे : ACP अशोक धुमाळ यांचे निधन, वरिष्ठांनी झापल्याने आत्महत्या केल्याचा संशय
ललित कला केंद्रातीलच एका विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते.परंतु, या नाटकातील काही संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. नाटकाचा प्रयोग उधळून लावण्यात आला. या घटनेनंतर तणाव वाढल्याने विद्यापीठात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
या नाटकातून कुणााचाही अवमान दुखावण्याचा हेतू नव्हता. रामलीला सादर करणाऱ्या कलाकारांच्या तालमीचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला होता. परंतु, कला समजून न घेताच गोंधळ घालण्यात आला, अशा प्रतिक्रिया कलाकारांनी दिल्या. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण दिसून येत आहे. सध्या येथे पोलीस बंंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिलासादायक बातमी ! पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार