पुणे : ACP अशोक धुमाळ यांचे निधन, वरिष्ठांनी झापल्याने आत्महत्या केल्याचा संशय

पुणे : ACP अशोक धुमाळ यांचे निधन, वरिष्ठांनी झापल्याने आत्महत्या केल्याचा संशय

पुणे : बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने जखमी झालेल्या फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (Ashok Dhumal) यांचे आज (29 जानेवारी) रात्री उशीरा निधन झाले. त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 15 जानेवारी रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र पोलिसांकडून (Police) या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. (Seriously injured Assistant Commissioner of Police Ashok Dhumal died after after fell from the balcony)

आत्महत्या केल्याची चर्चा

एका बाजूला धुमाळ पाय घसरुन पडल्याचे सांगण्यात येत असतानाच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तीन महिन्यांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात टोळीयुद्धात एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाचा तपास झोन एकच्या म्हणजेच फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्याकडे देण्यात आला होता.

साता समुद्रापार पुण्यातील विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या मुद्यावर वेधलं संपूर्ण जगाचं लक्ष

मात्र या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे आरोपी आणि साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला होता. निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आल्याने आरोपींची सुटका झाल्याने पोलीस दलावर न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. कायदेशीर प्रक्रियेतील या त्रुटीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धुमाळ यांना झापले होते. यानंतर ते नैराश्येत गेल्याची चर्चा होती.

रोहित पवार यांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

अशात सोमवारी ते बाल्कनीतून पडून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, दोन डीसीपी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.  त्यामुळे पोलिस दलात धुमाळ यांनी नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या अफवांना पूर्णविराम दिला होता. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने ते जखमी झाल्याचे स्पष्टीकरण या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र जवळपास 15 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube