Download App

Pune News : ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांची सत्व परीक्षा; ओला-उबरसह स्वीगी झोमॅटोची सेवा आज बंद

  • Written By: Last Updated:

पुणे : ऐन सणासुदीच्या काळात लाखो पुणेकरांना आज (दि. 25) सत्त्व परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कारण विविध मागण्यांसाठी ओला-उबर (Ola Uber In Pune) सह ऑनलाईन फुड डिलीव्हरीसाठी काम करणाऱ्या कामगारांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये छानसं भटकत शॉपिंग करता करता ऑनलाईन फुड मागवून पोटपुजा करण्याचा विचार असणाऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरलं जाणार आहे. (Ola Uber Swiggy Delivery Employee Strike In Pune )

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

नुकताच दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे दिवाळीचे. यासाठी शहरातील विविध भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे, सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे शक्यतो नागरिक या काळात ओला किंवा उबरने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, आज असे काही नियोजन करून खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांचे चांगलेच हाल होणार आहेत.
याशिवाय खरेदीला गेल्यानंतर अनेकजण ऑनलाईन फुड (Online Food Delivery) मागवून खरेदी करता करताच पोटपुजा करण्याचाही आनंद घेतात. मात्र, ज्या पद्धतीने ओला-उबरने काम बंदचं हत्यार उपसलं आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन फुड डिलीव्हरी करणाऱ्या ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन (Ola, Uber, Urber, porter) या कंपन्यांसाठी काम करणाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंडवड परिसरात एखदिवसाचं काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 सेवा बंद ठेवण्याचं कारण काय?

ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन या कंपन्यांनी पुकारलेलं एकदिवसीय काम बंद आंदोलन हे कंपन्यांकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबावी यासाठी केले जात आहे. तसेच राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील गिग कामगार नोंदणी आणि कल्याणकारी कायदा लागू करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

बिशनसिंह बेदी यांनी भारतीय क्रिकेटला नेमकं काय दिलं?

नेमक्या मागण्या काय?

आज पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये ओला-उबरचे अनेक वाहन चालक सहभागी होणार आहेत. कॅबचे मूळ दर रिक्षा टॅक्सी मीटरप्रमाणेच निश्चित केले जावेत अशी मागणी या चलकांची असून, त्यासाठी खटुआ समितीची शिफारस मान्य करण्याची मागणी चालकांनी केली आहे. याशिवाय एव्हरेस्ट फ्लीट इत्यादी कंपन्यांनी सामान्य कॅब चालकांचा दैनंदिन व्यवसायात अडथळा निर्माण करु नये अशी मागणीही कॅब चालकांनी केली असून, एखाद्या ट्रीपदरम्यान चालकांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी ऑनलाईन किंवा ऑफलाईन सपोर्ट सिस्टम तयार करावी. ग्राहकांच्या तक्रारीनंतर चालकांवर होणाऱ्या कारवाईची शहनिशा करण्यात यावी. पिक-अप चार्जेस, वेटिंग चार्जेस, पॅसेंजर कॅन्सलेशन चार्जेस, नाईट चार्जेस पूर्वीप्रमाणेच असावेत अशा मागण्या कॅब चालकांनी केल्या आहेत.

ज्या पद्धतीने ओला उबरच्या कार आहेत. त्याप्रमाणे अनेक रिक्षाचालकदेखील या कंपन्यासोबत जोडले गेले आहेत. ते देखील आजच्या संपात सहभागी असून, प्लॅटफॉर्म फी ताबडतोब थांबवण्याबरोबरच मीटरप्रमाणे वेटिंग फी भरण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे. तसेच अॅप्सवर रिक्षांपेक्षा कॅब स्वस्त झाल्यामुळे रिक्षा परवडत नसल्याने यावर ठओस उपाययोजना करण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

फूड डिलीव्हरी बॉयच्या प्रमुख मागण्या काय?

आजच्या संपात ओला-उबरसह ऑनलाईन फुड डिलीव्हरी करणारे लाखो कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्याप्रमाणे कॅब चालक आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.तशाच काही मागण्या फुड डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीदेखील ठेवल्या आहेत. यात प्रमामुख्याने ऑर्डरचे दर सर्वांसाठी एकसारखे असण्यासोबतच सध्याच्या दरात किमान 50% ने वाढ करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच डिलीव्हरीदरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रभावी यंत्राणा असावी. यासहप्रतिदिन किमान वेतन मिळण्याची सोय असावी अशा प्रमुख मागण्या ऑनलाईन फुड डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

Tags

follow us