Pune Porsche Accident : राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुणे पोर्शे कार (Pune Porsche Accident) अपघात प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघा जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल यांना रक्ताचे नमुने बदलण्यात मदत केल्याची बाब आता पोलीस तपासात उघड झाली आहे. आदित्य अविनाश सूद आणि सतीश मित्तल अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलिसांच्या या कारवाईने या अपघात प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण : मृत मुलांच्या पालकांना 10 लाखांची मदत, शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात पोलिसांनी याआधी काही जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीत कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय येण्याआधीच पोलिसांनी आणखी दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना आता लवकरच न्यायालयात हजर केले जाईल.
कल्याणी नगरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने दुचाकीवर चाललेल्या तरुण-तरुणीला उडवलं. त्यावेळी हा मुलगा अलिशान आणि अत्यंत महागडी असलेली पोर्शे ही गाडी चालवत होता. या अपघाताची देशभरात चर्चा झाली होती. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडीने भरधाव वेगाने अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Kalyani Nagar Car Accident मधील Porsche कार गुगल ट्रेंडमध्ये टॉपला; प्रकरण नेमकं काय?