Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त, तीन तरुणांना अटक

Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त, तीन तरुणांना अटक

Pune Crime News: पुण्याची ओळख आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. (Pune Crime) ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, हे सर्वांना आता पाहायला मिळत आहे. (Pune Police) गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. (Pune Drugs Case) तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात आणखी कुणी आहेत का? याचा देखील कसून तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सध्या तरी लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून 3 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल 1 कोटी रुपयांचे 471 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे असं ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सरकारला अल्टिमेटम आज थेट पवारांची भेट; महायुतीला धक्का देण्याचा कडूंचा प्लॅन? 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला अमली पदार्थाविषयी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लोहगाव इथल्या विघ्नहर्ता अपार्टमेंटमध्ये छापा टाकत 3 तरुणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube