Download App

पुण्यात अकराशे कोटींचे ड्रग्ज जप्त; देशभरात ‘एमडी’चा सप्लाय, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

  • Written By: Last Updated:

Pune Police seized 1100 crore md drugs : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुण्यात एमडी ड्रग्जचा हजारो कोटी रुपयांचा साठा पुणे पोलिसांना (Pune Police) जप्त केलाय. पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 कोटी रुपये इतके आहे. पुण्यातून देशभरात एमडीचा पुरवठा होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संबंध समोर येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीही तपास करत आहेत.

अशोक चव्हाण यांचा फक्त ट्रेलर, तीन तासांचा पिक्चर बाकी; नितेश राणेंचा मोठा दावा

पुणे शहरातील विश्रांतवाडी भागातील एका गोदामातून 55 किलो एमडी जप्त केल्यानंतर पोलिसांनी त्याची लिंक शोधली. त्यात कुरकुंभ येथील ‘अर्थकेम’ कारखान्यातून सहाशे किलोपेक्षा अधिक ‘एमडी’ जप्त करण्यात आले आहे. अनिल साबळे याच्या हा औषध निर्माण कारखाना आहे. त्या कारखान्यातील एक रसायन शास्त्रज्ञला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. यातील हैदर शेख या आरोपीकडून विश्रांतवाडी येथे असलेल्या एका गोदामातून १०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. आणखी काही ठिकाणी पोलिसांकडून शोध मोहिम सुरू आहे.

‘टिकणारं आरक्षण देऊ’ ही सरकारकडून दिशाभूलच; बापटांनी उलगडून सांगितलं

या ड्रग्ज प्रकरणाचा अनेक राज्यामध्ये संबंध आढळून येत आहे. पुण्यातून हे ड्रग्ज देशातील इतर भागातील पुरवले जात आहे. दिल्लीपर्यंत ड्रग्जचा संबंध आढळून आला आहे. मुंबई, दिल्ली येथे तपासासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत. इतर राज्यांमध्ये तपास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का? बाहेरच्या व्यक्तीचा किती संबंध आहे, या बाजूनेही तपास सुरू असल्याचे माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्यासह गुन्हे शाखेची सर्व पथके कसून तपास करीत आहेत.

कुणालाही सोडणार नाहीः देवेंद्र फडणवीस

ड्रग्ज प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. ड्रग्ज प्रकरणाचे राज्याबाहेर संबंध आढळून आले आहे. त्या बाजूने पोलिस तपास करत आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. पोलिसांचा संबंध आढळला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

follow us