Why Murlidhar Mohol Calls Kigmaker Of Pune Againt’s Ajit Pawar : महानगर पालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सर्वांच्या मुखी एकच नाव होतं आणि ते म्हणजे पुणे महानगरपालिकेचं. त्यात ऐनवेळी अजितदादांनी महायुतीत लढणार नसल्याचे सांगत काका शरद पवारांसोबत गेले. पण त्याचा फायदा झाला नसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिका निवडुकीत जाएंट किलर किंवा विजयामागचं शिल्पकार जर कुणी असतील तर, ते म्हणजे खासदार मुरलीधर मोहोळ. पण, मोहोळ अजितदादांवर कसे भारी पडले? त्याबद्दल जाणून घेऊया…
PMC Election : खरचं वसंत मोरेंना फक्त 600 मतं मिळाली? पराभवानं ‘कात्रज’चा घाट दिसला का?
अजितदादा कुठे चुकले?
पुणे महापालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) निवडणुकांमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याची अनेक कारणं आहेत. त्यातही मुख्य कारण म्हणजे राजकीय रणनीती हेच आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप आणि त्याखालोखाल तळागाळात कार्यकर्ते आणि उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात गेलेला वेळ या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
पटलावर फुल्ल कॉन्फिडंट पण…
राजकीय रणनीतीच्या पटलावर अजितदादा फुल्ल कॉन्फिडंट वाटत होते. पण, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णयाला शेवटपर्यंत खो मिळत होता. ज्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असे जाहीर करण्यात आले तोपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी आणि इच्छूक उमेदवारांनी दादांना रामराम केलेला होता. याचाच अर्थ काय तर, समोरची परिस्थिती लक्षात येत असतानाही दादा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी थोडेसे गोंधळ्याचे चित्र होते. हा विलंब त्यांना महागात पडला.
भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?
थेट आरोपांवर संयमी भूमिका
महायुतीत घटक पक्ष असूनही अजित पवारांनी पुण्याचे माजी महापौर आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट आरोप करत होते. रासने-मोहोळ-बिडकर यांच्यावर महापालिकेतील टेंडर प्रक्रियेत कसा भष्ट्राचार झाला, असे सांगत या तिघांना जेरीस आणले. मोहोळ यांच्याविरुद्ध दंड थोपडल्याने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळ देत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. एवढेच काय तर, गुंड निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासही मोहोळ यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला. मात्र, दादांच्या या आरोपांवर मोहोळ यांनी आक्रमकपणे नव्हे तर, संयमीपणे उत्तरे दिली. हाच गुण दादांपेक्षा मोहोळांमध्ये वरचढ ठरला.
मुरलीधर मोहोळ किंगमेकर कसे ठरले?
मुरलीधर मोहोळ हे पुण्यात किंगमेकर ठरण्यामागे एकच कारण नाही, तर राजकीय गणित, संघटनात्मक ताकद आणि योग्य वेळी योग्य भूमिका या सगळ्यांचा मिलाफ आहे. मोहोळ यांची पुण्यातील मजबूत संघटनात्मक पकड हा एक त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. मोहोळ यांनी पुणे भाजपची संघटना तळागाळात मजबूत केली असून, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा नेटवर्क त्यांनी कायम एकत्र ठेवलाय. त्यामुळे महापालिका, विधानसभा, लोकसभा – कुठल्याही निवडणुकीत त्यांचा शब्द महत्त्वाचा ठरतो.
याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खासदार होऊनही मोहोळ यांनी सर्वमान्य नेता अशी प्रतिमा कायम ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या काळात मोहोळांना आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहण्यास मिळाले नाही. पण, ते त्यांच्या भूमिकांवर ठाम होते. भाजपमधील विविध गटांना एकत्र ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याने उमेदवार निवड, आघाडी-युती किंवा सत्तास्थापन – या सगळ्यात ते संयमाने वागले. पुण्यात भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट) यांच्यातील संघर्षात मोहोळ यांनी स्वतःला निर्णायक स्थानावर ठेवले. थेट वादात न अडकता, संख्याबळ आणि रणनीतीवर नियंत्रण ठेवलं.
दिल्लीपर्यंत पोहोच
पुणे महापालिकेतील सत्ता, स्थायी समिती, महत्त्वाची पदांवर मोहोळ यांनी काम केलं आहे. या सगळ्या प्रक्रियांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे कोण कुणाशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हे गणित ते अचूक ओळखतात. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणज मोहोळ यांचा केंद्रीय नेतृत्वाशी असलेला थेट संवाद हा मोठा प्लस पॉइंट. त्यामुळे पुण्यातील निर्णय फक्त स्थानिक राहत नाहीत, तर राज्य व राष्ट्रीय राजकारणाशी जोडले जातात. संख्या + संघटना + संयम + योग्य वेळ या चार गोष्टींमुळे मुरलीधर मोहोळ पुण्यात सत्ता मिळवणारे नाही, तर सत्ता कोणाला मिळेल हे ठरवणारे नेते ठरतात आणि याचमुळे महापालिका निवडणुकांमध्ये मोहोळ अजितदादांना भारी पडले.
