Download App

‘मला रात्री 3 वाजता फोन आला अन्..,’; अपघातानंतर घडलेलं टिंगरेंनी सांगितलं

मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी अपघात झाल्याचा फोन आला त्यानंतर मी पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास बोललो असल्याचं आमदार टिंगरेंनी सांगितलं.

Pune Accident News : अपघातानंतर मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी अपघात झाल्याचा फोन आला त्यानंतर मी पोलिसांना माहिती देऊन कायदेशीर कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं आमदार सुनिल टिंगरे (Sunil Tingre) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर भागात बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) यांच्या अल्पवयीन मुलाने तरुण-तरुणाला कारने चिरडलं. त्यानंतर मला स्वीय सहाय्यकाने फोन करुन अपघात झाल्याची माहिती दिली असल्याचं सुनिल टिंगरे यांनी सांगितलं आहे.

पुणे पोलिसांच्या ‘पाच’ चुका… ‘पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी’ प्रकरण शेकलं!

पुण्यात हा अपघात घडल्यानंतर बिल्डरचा अल्पवयीन मुलगा असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर बोलताना आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुनिल टिंगरे म्हणाले, ही घटना माझ्या मतदारसंघात घडल्याबद्दल दुख: व्यक्त करीत असून मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी माझ्या स्वीय सहाय्यकाचा अपघात झाला असल्याचा फोन आला. त्यानंतर अग्रवाल यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली. त्यानंतर मी पोलिस ठाण्यात पोहोचून कायद्यानूसार कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं आमदार टिंगरे यांनी सांगितलं आहे.

मी पब आणि बारच्या नेहमीच विरोधात भूमिका घेतलीयं. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. मी पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याचीही मागणी करीत असल्याचं टिंगरे यांनी स्पष्ट केलंयं.

तीन वेळा मंत्रिपदाला नकार, सरकारी वाहनही नाकारलं; वाराणसीच्या पहिल्या खासदाराचं साधं पॉलिटिक्स

नेमकं काय घडलं होतं?
प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण कल्याणनगर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनीस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळतात त्यांनी वेदात अग्रवाल ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले. त्यावेळी वेदांत याचे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, घडलेली घटना दुर्दैवी असली तरी कलमात जामीन मिळण्याची तरतूद आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाने काही प्रमुख अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, आरोपीला येरवड्याच्या वाहतूक पोलिसात १५ दिवस काम करावे लागणार आहे. तसेच आरोपीने अपघातावर निबंध लिहावा, आरोपीने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अशा अटी कोर्टाने घातल्या. व त्याचा अहवाल कोर्टाला सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं.

follow us