दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या फरार वडिलांना बेड्या; बिल्डर विशाल अग्रवालला अटक

दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या फरार वडिलांना बेड्या; बिल्डर विशाल अग्रवालला अटक

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आपल्या आलिशान कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल. पुढे त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा अल्पवयीन आहे. याच मुलाने अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत दोघा जणांना चिरडले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाचे वडील पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावरच गुन्हा दाखल केला. मुलगा अल्पवयीन आहे याची माहिती असताना देखील त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या ७५ आणि ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांसह आरोपीवर कठोर कारवाई करा; पुणे अपघातप्रकरणी फडणवीसांचे आदेश

गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे विशाल अग्रवाल फरार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यांच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली होती. तसेच हा मुलगा ज्या हॉटेलमध्ये दारू पिला होता त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलाला दारू देणारे हॉटेलचे मालक प्रल्हाद भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणालाच सोडणार नाही, पोलिस आयुक्तांचा इशारा

दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आलायं. याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार असून अपघात प्रकरणी पब, बार, विना नंबर गाडी देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, तरुण-तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

पुणे विमानतळावर मोठा अपघात टळला; 180 प्रवाशांनी खचाखच भरलेलं विमान ट्रॅक्टरला धडकलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज