Pune News : पुणे पोलीस दलात खळबळ; लॉकअपमध्ये आरोपीची आत्महत्या
Prisoner Suicide In Jail : पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या लोकांमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने शिवाजी गरड याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्हा दाखल केली होती. त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लॉक मध्ये रात्री ठेवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने लॉकअपमध्ये पाहिले असता शिवाजी गरड हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पांघरूणासाठी दिलेल्या चादरची काठ कापून त्याच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला होता.
Nitesh Rane : दंगली घडवणारा मास्टरमाईंड मातोश्रीवर, नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पांघरूणासाठी दिलेल्या चादरीने घेतला गळफास
पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापून त्याच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.