बॅलेट पेपर इतिहासजमा! सुधारणांची गरज पण निवडणुका ‘ईव्हीएम’वरच होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

supreme court on election commission

नवी दिल्ली : देशातील कोणत्याही निवडणुका कधीच बॅलेट पेपरवर होणार नाहीत, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये काही सुधारणा करता येतील. पण आता निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होणार, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ही मागणी फेटाळून लावली. आज (24 एप्रिल) ईव्हीएम मशीनसंबंधीत सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. (Supreme Court has decided that elections will be held on ‘EVM’ only.)

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) द्वारे केलेल्या मतांशी सर्व व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिप्स जुळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. बुधवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणात या तंत्रज्ञानाशी संबंधित आणखी चार-पाच मुद्यांची माहिती मागवली आणि दुपारी दोन वाजता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बोलावले.

या सुनावणीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, “आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, आम्ही इतर कोणत्याही संवैधानिक संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आयोगाने शंका दूर केल्या आहेत. आम्ही तुमचे मत ऐकून ते बदलू शकत नाही, केवळ संशयाच्या आधारे आम्ही आदेश जारी करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर याबाबतचा निकाल राखून ठेवतं असल्याचेही सांगितले.

follow us