तीन वेळा मंत्रिपदाला नकार, सरकारी वाहनही नाकारलं; वाराणसीच्या पहिल्या खासदाराचं साधं पॉलिटिक्स

तीन वेळा मंत्रिपदाला नकार, सरकारी वाहनही नाकारलं; वाराणसीच्या पहिल्या खासदाराचं साधं पॉलिटिक्स

Varanasi Lok Sabha Constituency : मागील दोन निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. वाराणसी मतदारसंघाची देशभरात (Varanasi Lok Sabha Constituency) चर्चा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या मतदारसंघातून खासदार झालेल्या नेत्यांनी केंद्रात महत्वाची भूमिका बजावली. या मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार राहिलेले रघुनाथ सिंह केंद्रात मोरारजी देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या बाबतीत असे सांगितले जाते की ज्यावेळी त्यांना मंत्रिपदाची ऑफर मिळाली त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. ते कधी मंत्री राहिले नाहीत पण काँग्रेस संसदीय मंडळाचे सचिव राहिले.

1967 मधील निवडणुकीत सीपीएमच्या सत्य नारायण सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मोरारजी देसाई यांच्या बरोबर काँग्रेस (ओ) मध्ये जाणे पसंत केले. ज्यावेळी जनता पार्टीचे सरकार आले त्यावेळी मोरारजी देसाईंनी त्यांना शिपिंग कॉर्पोरेशनचे चेअरमन केले. याआधी 1968 मध्ये त्यांनी जिंक लिमिटेडचे चेअरमन म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी या पदासाठी ते फक्त एक रुपया पगार घेत होते. परंतु, त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात एक रुपयाही पगार घेतला नाही, असे येथील नागरिक सांगतात.

राजकारणातील दिग्गज! निवडणुका जिंकण्यातही मास्टर; नेत्यांच्या खासदारकीची स्टोरीही खास…

वाराणसी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडणूक जिंकणाऱ्याच्या यादीत शंकर प्रसाद जयस्वाल यांचे ही नाव आहे. जयस्वाल यांनी 1996, 1998 आणि 1999 मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. 1998 आणि 1999 मधील निवडणुका लोकसभा भंग झाल्यामुळे घेतल्या गेल्या होत्या. याच मतदारसंघातून 1980 मध्ये कमलापती त्रिपाठी खासदार राहिले. त्यावेळच्या इंदिरा गांधी सरकारमध्ये त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती.

सन 2009 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी सुद्धा वाराणसीतून विजय मिळवला होता. वाराणसी मतदारसंघ काँग्रेस आणि भाजप दोघांसाठी बालेकिल्ला राहिला आहे. परंतु 1989 मध्ये व्हीपी सिंह यांच्या जनता दलाच्या तिकिटावर अनिल शास्त्री खासदार झाले. तसेच 1977 मध्ये जनता पार्टीने विजय मिळवला. 1967 मध्ये सीपीएमचा उमेदवार विजयी झाला होता.

अर्ज मोदींचा पण, पॉलिटिक्स काका-पुतण्याचं; उमेदवारीच्या गर्दीतला किस्साही खास..

परंतु नरेंद्र मोदी यांनी मात्र येथे इतिहास रचला. 2014 च्या निवडणुकीत 3 लाख 71 हजार 784 मताधिक्याने विजयी झाले होते. तर 2019 मध्ये हेच अंतर पावणे पाच लाखांपेक्षा जास्त झाले होते. यानंतर मोदींनी तिसऱ्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एक दिवस आधी त्यांनी शहरात भव्य रोड शो केला. या रोड शो वेळी लाखोंची गर्दी झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज