Pune Swargate Rape Case Accused Dattatray Gade News : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडेला (Dattatray Gade) पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केल्याचं समोर आलंय.
गेल्या दोन दिवसापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. परंतु, दत्ता गाडेचा मोबाईल बंद असल्यामुळे शोधमोहिमेमध्ये अडथळा येत होता. स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली (Pune Crime News) होती. त्यानंतर आरोपी गायब होता. तो पळून त्याच्या गावी म्हणजेच शिरूरला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या गावामध्येच त्याचा शोध सुरू केला. अखेर आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री शेतातून अटक करण्यात आलीय. त्याला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर केला गेलाय.
मोठी घडामोड! युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की अमेरिकेत दाखल; युद्ध थांबणार?
पोलिसांनी दत्ता गाडेचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं, परंतु तो तिथं सापडलाच नाही. दत्ता त्याचे नातेवाईक महेश बहिरटी यांच्या (Pune News) घरी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आला. त्याने नातेवाईकांकडे पाणी मागितलं. मला पश्चाताप होतोय. माझी मोठी चूक झालीय, मला सरेंडर करायचं आहे, असं दत्ता गाडे नातेवाईकांना म्हणाला. त्यानंतर नातेवाईकांनी ही माहिती पोलिसांनी दिली.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 1800 कोटींचा खर्च पण, 16 तासांतच पाकिस्तान आऊट
पोलीसांनी या घराच्या परीसरामध्ये आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड तिथं आणलं, तेव्हा पोलीसांना त्याचा शर्ट सापडला. त्याआधारे डॅाग स्कॅाडनं पुढील रस्ता पोलीसांना दाखवला. यावेळी दत्ता नातेवाईकांच्या घराच्या परिसरामध्ये असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून होता. ग्रामस्थांनी हाच दत्ता गाडे असल्याचं स्पष्ट केलं. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं अन् पुण्याकडे कुच केली.
काल रात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तो गावी गेला होता. आरोपीचा शोध घेताना गावकऱ्यांनी देखील पोलिसांना मदत केली. दिवसभर शोधमोहिम करुन आरोपी पोलिसांना सापडला नाही, त्यामुळं पोलिसांनी रात्री देखील शोधमोहिम सुरूच ठेवली होती. अखेर आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय.