मोठी घडामोड! युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की अमेरिकेत दाखल; युद्ध थांबणार?

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता समाप्तीच्या दिशेने (Russia Ukraine War) वाटचाल करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अमेरिकेची सत्ता सांभाळताच युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार काही निर्णयही घेतले होते. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघात युक्रेनच्या (United Nations) विरोधात मतदान केले होते. त्यानंतर आता युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की थेट (Volodymyr Zelensky) अमेरिकेत दाखल झाले आहेत. त्यांचे विमान जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर लँड झाले आहे.
झेलेन्स्की ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांत एक मोठी डील होणार असल्याची चर्चा आहे. या डीलच्या माध्यमातून युक्रेनमधील दुर्मिळ खनिज संपत्ती अमेरिकेच्या हाती लागणार आहे. युक्रेनमधील दुर्मिळ खनिजे आणि अन्य खनिज संपत्तीच्या बाबतीत पुरावे अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. आता जे पुरावे आहेत त्यांना युद्धग्रस्त क्षेत्रातून बाहेर काढणे अशक्य आहे. यासाठी युद्ध थांबवावे लागणार आहे. यासाठीच डोनाल्ड ट्रम्प अनेक दिवसांपासून प्रय़त्न करत आहेत. दोन्ही देशांनी व्यवस्थित चर्चा करून तोडगा काढावा आणि युद्ध थांबवावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत.
अमेरिकेने युक्रेनला धक्का दिलाच! संयुक्त राष्ट्रांत चक्क रशियाला साथ; नेमकं काय घडलं?
युक्रेन बरोबरील डीलचा अमेरिकी करदात्यांना फायदा होईल. कारण यामुळे युक्रेनला मदत म्हणून आतापर्यंत जे अब्जावधी डॉलर दिले गेले आहेत त्याची भरपाई होईल. परंतु, अमेरिकी अधिकारी आणि तज्ज्ञांना या डीलवर संशय आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाही. कारण यु्क्रेनमध्ये दुर्लक्ष खनिज संपत्ती आहे याची कोणतीच ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. आता जी आकडेवारी उपलब्ध आहे ती जुनी आहे. यु्क्रेनमध्ये उपलब्ध असणाऱ्या खनिजांचे प्रमाण जागतिक पातळीच्या तुलनेत अतिशय कमी आहे असे तज्ज्ञांचे मानणे आहे.
डीलची आयडीया झेलेन्स्कींचीच
युक्रेनमधील खनिज संपत्तीच्या संदर्भात डील करण्याचा विचार यु्क्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचाच होता. त्यांनी मागील वर्षात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हा विचार मांडला होता. या डीलच्या मोबदल्यात अमेरिकेने आर्थिक मदत सुरुच ठेवावी अशी अपेक्षा झेलेन्स्की यांनी व्यक्त केली होती. असे असले तरी अमेरिकी अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव वास्तववादी आहे असे मानले नाही. युक्रेनमध्ये खनन व्यवसायात उतरण्यासाठी कोणतीही अमेरिकन कंपनी उत्सुक नाही. युक्रेनचे बहुतांश खनिज साठे रशिया नियंत्रित क्षेत्रात आहेत. या ठिकाणी पोहोचणे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे अमेरिकेला ही डील फायद्यात राहिल का याबाबत अमेरिकी तज्ज्ञांच्या मनात दाट शंका आहे.
रशिया युद्ध थांबवणार! अमेरिका अन् रशियाचा पुढाकार; ‘रियाद’मध्ये नेमकं काय घडलं?