Download App

पैशांशिवाय निबंधाची शिक्षा अशक्य; पुणे अपघात प्रकरणी राज ठाकरेंचे न्यायाधिशांवरही ताशेरे

Raj Thackeray यांनी पुणे अपघातात प्रकरणी पोर्शे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला निबंधाची शिक्षा दिल्याने न्यायाधिशांवरही ताशेरे ओढले.

Raj Thackeray Criticize judges too in Pune Accident : 19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे (Pune Accident) कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पैशांच्या देवाण-घेवाणीशिवाय निबंध लिहिण्याची अशक्य असल्याचं म्हणत न्यायाधिशांवरही ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे हे अमेरिकेतील सॅन होजे येथे सुरू असलेल्या बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनामध्ये बोलत होते.

‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुण्यामध्ये पोर्शे गाडीने एका अल्पवयीन मुलाने दोन तरुणांचा जीव घेतला. त्यानंतर माध्यमांमध्ये त्या मुलाची त्याच्या आई-वडिलांची, आजोबांची प्रचंड चर्चा झाली. मात्र ज्या दोन तरुणांचा जीव गेला. त्यांच्याबद्दल कोणीही बोलत नाही. त्यांच्या आई-वडिलांबद्दल बोलले जात नाही. तसेच हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी पोर्शे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला 300 शब्दांत निबंध लिहिण्याची शिक्षा केली. हे कोणते न्यायाधीश आहेत? पैशांची देवाण-घेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारच्या शिक्षा न्यायालयात दिल्याच जाऊ शकत नाही. त्यामुळे विश्वास कुणावर ठेवायचा? पोलीस, न्यायालय, नेते की प्रशासन. हे सर्व यंत्रणांवरचा लोकांचा विश्वास उडाला. तर आपण आराध्य ते कडे जाऊ.

मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड, आजच स्वीकारणार पदभार

प्रकरण काय?

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तर काही दिवसापूर्वीच अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना देखील तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला होता.

follow us