RPI Athawale group : आरपीआय आठवले गटाने आता महायुतीचं टेन्शन वाढवल्याचं चित्र आहे. (RPI) येणाऱ्या रविवारी पुण्यात रामदास आठवले कार्यकर्ता मेळावा घेऊन विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या काही मागण्या आता पुढं केल्या आहेत. महायुतीत आम्हाला 12 ते 15 जागा सोडव्यात अशी मागणी आरपीआय आठवले गटाने केली आहे.
Sharad Pawar : मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य योग्य नाहीच; शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर
ज्या जागा आम्ही मागत आहोत, त्या जागांची आम्ही घोषणा करणार आहोत. रविवारी ज्या जागा मागितल्या आहेत त्यांची घोषणा करणार आहोत असंही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. आम्हाला उस धारक शेतकरी हे चिन्ह मिळालं आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे पुढील सर्व निवडणुका आम्ही उस धारक शेतकरी या चिन्हावर लढवणार आहोत अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
Maharashtra Band: उद्याचा महाराष्ट्र बंद विकृती विरुद्ध संस्कृती; दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा
पुण्यातील कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी, पिंपरी या विधानसभा मतदारसंघावर आरपीआय दावा ठोकणार आहे असंही समोर आलं आहे. तसंच, आम्हाला जागा दिल्या दिल्या नाही तर नाराजी वाढेल आंबेडकरी जनतेचा रोष वाढला तर त्याचा काय फटका असेल हे दिसेलच असा इशारा देत लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर रामदास आठवले यांचा फोटो वापरावा अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे.