राज ठाकरेंचं ठरलं! उद्यापासून महाराष्ट्र दौरा; विधानसभेचं रणशिंग फुंकणार
Raj Thackeray : राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात (Congress Party Meeting) वाहू लागले आहेत. मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. कुणाला किती जागा मिळणार? कुणाला तिकीट मिळणार? याबाबत अजून काहीही निश्चित नाही. तर दुसरीकडे मनसेने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. राज्यातील 224 मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंचा झंझावाती महाराष्ट्र दौरा उद्यापासून सुरू होणार आहे. राज ठाकरे पुण्याहून (Raj Thackeray) सोलापूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. राज ठाकरेंनी कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली होती. त्यानंतर उद्यापासून लगेचच दौऱ्याला सुरुवात केली आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 13 मागण्या; CM शिंदेंनी वायुवेगाने फिरवली सूत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेने उमेदवारही दिले नव्हते. परंतु, विधानसभेसाठी मात्र राज ठाकरेंचा मूड पूर्ण बदलला आहे. निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून त्यांनी आधीच महायुतीत धडकी भरवली आहे. या स्वबळाचा फटका बसेल याची जाणीव झाल्याने महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना महायुतीतच लढण्याची विनंती केली होती. मात्र त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी राज्यातील 224 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्याआधी राज्यातील विविध मतदारसंघात निरीक्षक पाठवून या मतदारसंघांचा अभ्यास केला होता. या सर्वेचे अहवाल हाती आल्यानंतर राज ठाकरेंनी आणखी दोन पावले पुढे टाकली आहेत. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज सकाळी ठाकरे पुण्याहून सोलापूरकडे रवाना झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरेंचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणं भोवलं; मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी
राज ठाकरे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या जिल्ह्यांत पक्षाने आधी जे निरीक्षक पाठवले होते त्यांच्यासोबत राज ठाकरे बैठका घेणार आहेत. येत्या 13 ऑगस्टपर्यंत त्यांचा हा दौरा सुरू राहणार आहे. 4 ऑगस्टला म्हणजेच आज राज ठाकरे सोलापुरात आहेत.
त्यानंतर 5 ऑगस्ट धाराशिव, 6 ऑगस्टला लातूर, 7 ऑगस्ट रोजी नांदेड, 8 ऑगस्ट हिंगोली, 9 ऑगस्ट परभणी, 10 ऑगस्ट बीड, 11 ऑगस्ट जालना, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरात असणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे. पक्षाची ताकद किती आहे यांसह अन्य महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहेत.