Ramesh Kadam : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम(Ramesh Kadam) यांची तब्बल आठ वर्षांनंतर मोहोळ मतदारसंघात एन्ट्री झाली आहे. आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम(Ramesh Kadam) मागील 8 वर्षांपासून तुरुंगात होते. अखेर त्यांची तुरुंगातून सूटका झाल्यानंतर मतदारसंघात दाखल झाले आहे. तुरुंगातून आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.
बारामती लोकसभा सुनेत्रा पवार लढवण्याची चर्चा; महाविकास आघाडीचा उमदेवार कोण? जयंत पाटील म्हणाले…
रमेश कदम येणार म्हणून कदम समर्थकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीसह त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, आणि अजित पवार गटाकडूनही स्वागत करण्यात आलं आहे.
Asian Games 2023 : भारताने खाते उघडले; नेमबाजी आणि रोईंग प्रकारात रौप्यपदकांवर कोरलं नाव
अजूनही क्रेझ कायम :
घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर आता आठ वर्षांनंतर ते मोहोळमध्ये आले आहेत. २०१५ नंतर प्रथमच मोहोळ विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोलापूर महामार्गावरील मोडनिंबपासूनच त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले.
सोमय्या प्रकरणात लोकशाही वाहिनीवर मोठी कारवाई ! पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश
त्यांच्या स्वागतासाठी मोहोळ शहरातील विविध भागांत समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे माजी आमदार कदम यांची मतदारसंघात आजही क्रेझ असल्याचे दिसून येते.
कार्पोरेट्सची अब्जावधी रुपयांची कर्जमाफ करायची अन् पोशिंद्याला…; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
रमेश कदम यांची ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातून 20 ऑगस्टलाच सुटका झाली. त्याचवेळी कदम यांनी आपण बाहेर आल्यानंतर मोहोळमध्येच राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानूूसार आज ते मोहोळमध्ये दाखल झाले आहेत.
एकीकडे आजची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असून दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही त्यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता रमेश कदम कोणत्या पक्षात जाणार? राष्ट्रवादीत असले तर कोणत्या गटात सामिल होणार? याकडं सर्वाचंच लक्ष लागून राहिलं आहे.