मोठी बातमी! धंगेकर काय थांबायचं नाव घेईनात, मुरलीधर मोहोळांचं 200 कोटींचं नवं प्रकरण काढलं

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आणि गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. त्यांच्यामुळे सराकरचे मोठ नुकसान झाल्याचा दावा

News Photo (71)

News Photo (71)

शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी (Pune) भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आणि खळबळजनक आरोप केला आहे. मोहोळ यांनी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लायिंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केली. मोहोळ यांनी बॉम्बे फ्लायिंग क्लबवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटींचे नुकसान झाले, असा मोठा दावा धंगेकर यांनी केला आहे. तसेच मोहोळ यांनी विशाल गोखले यांच्यामार्फत कोणत्या कामाची दलाली केली आहे? असा गंभीर सवालही सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या आरोपांनी नवा बॉम्ब फुटला आहे.

अगोदरच पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामुळे मोहोळ अडचणीत आलेत. त्यातच आता धंगेकर यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्विट केले आहे. यात त्यांनी आरोपांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही’ असा दावा धंगेकर यांनी केलाय. तसंच, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वीदेखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे.

Video : जैन मुनींची भेटीनंतर मोठा राडा; खासदार मुरलीधर मोहळांनी सांगितली A टू Z स्टोरी

सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री. विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेटदेखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे, असा खळबळजनक आरोप धंगेकर यांनी केला. ‘जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे.

नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी ₹200 कोटींची वसुली करणे अपेक्षित होते. परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे, असा मोठा आरोपही धंगेकर यांनी केलाय.पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही असं ते म्हणालेत.

Exit mobile version