Download App

पवार-विखेंच्या घरात जन्मलो नाही म्हणून माझं कुटुंब उद्ध्वस्त… वाडेश्वर कट्ट्यावर धंगेकरांचे गौप्यस्फोट

Ravindra Dhangekar पुण्यातील वाडेश्वर कट्टा येथे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे यांनी निवडणुकीदरम्यांचे किस्से सांगितले.

Ravindra Dhangekar Expose about trouble of family during election : लोकसभा निवडणुकीच्या ( election ) चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पुण्यातील वाडेश्वर कट्टा या ठिकाणी पुणे लोकसभेसाठी लढणारे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, ( Ravindra Dhangekar ) वंचितचे वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीदरम्यांचे किस्से सांगितले. धंगेकरांनी निवडणुकीदरम्यान आपल्या कुटुंबीयांना त्रास दिला गेल्याचा गौप्यस्फोट ( Expose ) केला. तसेच या कट्ट्यावर आमंत्रण देऊन देखील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ मात्र गैरहजर राहिले.

आजोबा नेपाळचे PM, मुलगा केंद्रात मंत्री; मध्य प्रदेशच्या माधवीराजे कालवश

यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले की, ही निवडणूक कोणत्याही जातीय समीकरणांवर झाली नाही. तर विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी ही निवडणूक हातात घेतली. तसेच या निवडणुकीत कोणी कोणावरती वैयक्तिक टीका टिपणी केली नाही. मात्र माझ्या बाबतीत तो प्रकार घडला. माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. तसेच माझं आर्थिक नुकसान देखील झालं. त्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती.

Shivani Bawkar : शिवानी बावकरचा साडीतील मोहक लूक

मला वरून नोटीस आल्या. माझी काम बंद पाडले गेले. निवडणुकीदरम्यान हा त्रास मी कोणालाही सांगितला नाही. पण हा सर्व प्रकार थोड्या दिवसात तुम्हाला कळेल. तसेच मी काही पवार किंवा विखेंच्या घरात जन्माला आलेलो नाही. त्यामुळे मी काहीही गमवायला नाही. तर कमवायला आलोय. असं म्हणत यावेळी धंगेकरांनी निवडणुकीदरम्यान आपल्याला विरोधकांकडून देण्यात आलेल्या त्रासाबद्दल गौप्यस्फोट करण्यात आला.

https://youtu.be/THhqS51-8RY?si=ctt_lUwf7JyV9UqF

follow us