Download App

महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

पुणे नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही (Road Accident) असाच भीषण अपघात घडला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. नारायणगाव जवळ हा अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटोला आयशर टेम्पोची धडक बसल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली  होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे दाखल झाले. अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जामखेडमध्ये भीषण अपघात! कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळली, चौघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो वाहनाला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की मॅक्स गाडी चेंडूसारखी फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही गाडी आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एक लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले आहेत.

या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. लागलीच पोलिसांचे पथक येथे दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

धक्कादायक! बोलेरोने रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडलं; भीषण अपघात

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.

follow us