धक्कादायक! बोलेरोने रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडलं; भीषण अपघात
Road Accident News : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Road Accident) चालली आहे. भरधाव वेगातील वाहनांकडून पायी चालणारी किंवा रस्त्याच्या कडेला झोपलेली माणसे चिरडली जाण्याच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. आताही असाच एक भीषण अपघात नंदूरबार जिल्ह्यात घडला आहे. नंदूरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ऐन दिवाळी सणात ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
भीषण अपघात! एसटी बस अन् ट्रकच्या धडकेत सहा ठार; 14 जण जखमी
या अपघातात काही प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नंदूरबार ते धानोरा रस्त्यावर एक दुचाकी खराब झाली होती. या ठिकाणी आणखीही दोन दुचाकी थांबलेल्या होत्या. त्याच वेळी धानोरा गावाकडे भरधाव वेगात एक बोलेरो जीप निघालेली होती. या जीपने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना चिरडलं. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. बोलेरोही उलटून पडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक येथे गोळा झाले. त्यांनी बोलेरो जीप सरळ केली. या अपघातातील एका जखमी व्यक्तीला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्यक्ती गंंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यानंतर पोलीसही येथे दाखल झाले होते. त्यांनी घटनेची माहिती घेेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.
देवदर्शनाला जाताना पत्नी अपघातात ठार; ऐन सणादिवशी पाटील कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर