देवदर्शनाला जाताना पत्नी अपघातात ठार; ऐन सणादिवशी पाटील कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

  • Written By: Published:
देवदर्शनाला जाताना पत्नी अपघातात ठार; ऐन सणादिवशी पाटील कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Accident : दिवाळीनिमित्त पतीसोबत देवदर्शनाला निघालेल्या मोनाली योगेंद्र पाटील (वय ३०, रा. इंदिरानगर, वडणगे) यांचा अपघाती मृत्यू झाला. वडणगे गावातील अस्वले मळ्याजवळ (Accident ) शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी घसरून हा अपघात घडला.

बंडोबांचं अर्धशतक! भाजपला सर्वाधिक टेन्शन; काँग्रेसही हैराण, कुणाचं गणित बिघडणार?

ऐन दिवाळीदिवशी घडलेल्या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाटील कुटुंबीय शनिवार पेठेत राहण्यास होतं. त्यांनी अडीच वर्षांपूर्वी वडणगेत स्वतःचं घर घेतलं होतं. शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस असल्याने पाटील दाम्पत्य देवदर्शनासाठी बाहेर पडलं होतं.

शहराकडे येत असताना अस्वले मळ्याजवळ त्यांची दुचाकी घसरली. दोघेही रस्त्यावर कोसळले. यामध्ये मोनाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube