Download App

Rohit Pawar: ‘वयावरुन टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित दादांना रोहित पवारांनी सुनावलं

Rohit Pawar on Ajit Pawar: ‘पवार साहेब आजपर्यंत मार्गदर्शन करत आले आहेत. आम्ही युवा म्हणून बोललो की आमचे वय काढले जातात. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत असं आम्हाला बोलले जाते. आमच्या वयात पवार साहेब सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले होते. आताच्या नेत्यांचे जे वय आहे, काहींचे ६५ काहींचे, काहींचे ७० तर काहींचे ६३, या नेत्यांचं जसे वय वाढेल, तस या नेत्यांचे मत होईल, की आमचंच योग्य आणि बाकी मुलामुलींचे वयावरुन टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना आमदार रोहित पवारांनी चांगलच सुनावलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना महत्त्वाचे काम आले असावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अकार्यक्षम असावे आणि अजितदादा हे कार्यक्षम असतील म्हणून ते आजच्या सभेला आले नसावे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला येणार हे मला कळलं होतं. माझा कार्यक्रम बारामतीमध्ये होता, पण आजचा कार्यक्रम महत्त्वाचा होतं. म्हणून मी आलो दुसरे का नाही आले मला माहिती नाही. असे यावेळी रोहित पवार म्हणाले.

आमदार पात्रतेच्या निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत! म्हणाले, ‘जब बंदूक न हुई, तब तलवार होगी’

तो अजित पवार यांचा वयक्तिक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री हे देखील खूप व्यस्त असावेत म्हणून ते देखील आले नसतील. वी एस आय शेतकरी हितासाठी काम करत आली आहे. पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली योग्य निर्णय होतात म्हणून इतरांचा काही रोल नसावा म्हणून त्यांनी येणे टाळले असावेत. आमचं म्हणणे आहे की तलाठी भरती आणि सर्व भरतीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. भाजप सरकारमध्ये हेच सुरू आहे, कोणी लक्ष देत नाही. हा मुद्दा मुलांनीच पुढे आणला आहे. विखे पाटील यांना आमच्यावर काही कारवाई करायची असेल तर करा, पण युवा पिढीकडे लक्ष द्या, असे आव्हान रोहित पवारांनी यावेळी केले आहे.

काल सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय विरोधात दिला. सुप्रीम कोर्टात गेलं की हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल. राज्यात जनतेचे प्रश्न नाही आमदारांचे प्रश्न सुटत आहेत. विधानसभा अध्यक्ष यांना भाजपच्या मोठ्या नेत्यांचे ऐकावे लागले आणि तसा निर्णय द्यावा लागला. संविधान आता टिकेल का? असा प्रश्न आता आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

follow us