Download App

संगिता वानखेडेंना धमकावताना पत्रकारालाही मारहाण; आरोपीची पोलिस ठाण्यातच ‘दादागिरी’

Sangeeta Wankhede : मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल थेट भाष्य केल्याप्रकरणी संगिता वानखेडे (Sangita wankhede) यांच्या घरातू घुसून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. याचवेळी वानखेडेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनीही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

‘जयंत पाटील शेवटचा डाव आखणार..,’;’दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते’ म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संगिता वानखेडे यांनी मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवार यांच्या हाती असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. वानखेडे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अविनाश परबत प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले. त्याचवेळी काही लोकांकडून मारहाण झाल्याचा आरोप अविनाश परबत यांनी केला आहे. संबंधित व्यक्तींनी अंगावर धाव घेत मारहाण केली असल्याचं परबत यांनी सांगितलं आहे.

मोठी बातमी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना PM मोदींचे गिफ्ट : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर FRP मध्ये वाढ

या घटनेनंतर पत्रकार अविनाश परबत हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता असून संबंधित व्यक्तींकडून राजकीय दबाव आणून पोलिस ठाण्यातच धमकी दिल्याचा प्रकार सुरु असल्याचाही आरोप अविनाश परबत यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी यावं, असं आवाहन परबत यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे त्यांच्याच जुन्या सहकारी संगिता वानखेडे यांना भोवले. एका कार्यकर्त्याने वानखेडे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातील निवासस्थानी जाऊन वानखेडेंना धमकावले आहे.

INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews

“तु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात का बोलतेस? तु जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलते? असं म्हणत राहुल नामक एका इसमाने संगीता वानखेडे धमकावले आहे. दरम्यान, संगीता वानखेडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना देखील धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे.

संगीता वानखेडेंकडून जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप :
अजय बारस्कर महाराजांनंतर लेट्सअप मराठीशी बोलताना संगिता वानखेडे यांच्याकडून मनोज जरांगे यांची पोलखोल करण्यात आली होती. वानखेडे म्हणाल्या होत्या की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतच्या अनेक क्लिपा आहेत. पुढील काही दिवसांतच त्या क्लिपा बाहेर येणार आहेत. ज्यावेळी क्लिपा बाहेर येतील ना तेव्हा मराठा बांधव मनोज जरांगेंना पळून पळून मारणार आहे, असे ते म्हणाले होते.

तसेच मनोज जरांगेंचं रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे, हा कुठल्याही सहकाऱ्याला विचारत नव्हता. मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे मी मरणाला भीत नाही त्यामुळे थेटपणे सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे पुण्यात जरांगेंचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. जो शरद पवार याआधी मराठा आरक्षणाला विरोध करीत होता. आता त्याचे कार्यकर्ते बॅनर का लावत आहेत. बाकीचं सभा कोणी घेतल्या हे सर्वांनाच माहित आहे, सभेसाठी करोडो रुपये, जेसीबी कुठून आले चेक करा? असे आरोप संगिता वानखेडे यांनी केले होते.

follow us