Sanjay Kakade On Muralidhar Mohol after Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यात महायुतीचा (Mahayuti) धुव्वा उडाला आहे. मात्र त्यात देखील भाजपच्या खासदारकीसाठी अनेक नवख्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. त्यात पुण्यातील नवनिर्वाचित खासदार मुरळीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांचं नाव येत. मोहोळांना तिकीट दिल्याने संजय काकडे ( Sanjay Kakade ) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्यांनी मोहोळांच्या प्रचाराचं काम व्यवस्थित केलं नाही. असंही बोललं गेलं काकडे यांनी त्यावर मला मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. असं म्हणत त्यांना खोचक टोला लगावला आहे. ते लेट्सअप मराठीला दिसलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ भागात 3 दिवसांत दाखल होणार मान्सून; होणार मुसळधार पाऊस
यावेळी बोलताना संजय काकडे म्हणाले की, ज्या ठिकाणी मोहळ यांचा प्रचार करण्यासाठी माझी यंत्रणा काम करत होती. माझे नगरसेवक काम करत होते त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे पुण्यात मी मुरलीधर मोहोळांसाठी प्रचाराची धुरा व्यवस्थित सांभाळली नसती तर इथे देखील त्यांचा पराभव झाला असता.
आम्ही बांगलादेशी परिसरात हरलो; असं ट्वीट करणं सोमय्यांच्या अंगलट येणार? ठाकरे गटाची तक्रार
मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मी नाराज होतो. कारण मला तिकीट मिळण्याचे अपेक्षा होती. हे मी जाहीरपणे बोलून देखील दाखवलं आहे. मात्र ती नाराजी मी पक्षाच्या कामांमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमध्ये आणली नाही. तेच मी माझ्या नगरसेवकांना देखील सांगितल होतं. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी केलेल्या प्रचार कामासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. अगदी मुरलीधर मोहोळ यांच्या देखील सर्टिफिकेटची मला गरज नाही. अशी प्रतिक्रिया यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
तसेच यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आणि भाजपचा धुव्वा उडाला आहे. त्यावर पुण्यातील भाजपचे नेते संजय काकडे यांनी या पराभवाची कारणमीसांसा केली. यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर देत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या खासदारावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की, आमच्या एका खासदाराने संविधान बदलण्याची भाषा केली. ते त्याचं वैयक्तिक मत होतं. मात्र त्याचा फटका 3 ते 4 राज्यात भाजपला बसला आहे.