Download App

भाजपकडून घराणेशाहीला संधी, तुम्ही मात्र राहुल कलाटेंना साथ द्या, जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी

भाजपने कर्तबगारीची तपासणी न करता घराणेशाहीला संधी दिली. त्यापेक्षा राहुलदादा किती तरी उजवे आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी

  • Written By: Last Updated:

Jayant Patil at Rahul Kalate Campaign Sabha : राहुलदादा तडफदार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, बहिणींपासून युवकांपर्यंत सर्वांशी उत्तम संवाद ते साधू शकतात, सर्वसमावेशक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून हा उमदा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्यास केवळ चिंचवडचाच नाही तर संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. ( Rahul Kalate) त्यामुळे आपण सर्वांनी मिळून यावेळी राहुलदादांना विधानसभेत पाठवायचं ठरवलं आहे. असं प्रतिपादान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ते रहाटणी येथे प्रचार सभेत बोलत होते.

भाजपने कर्तबगारीची तपासणी न करता घराणेशाहीला संधी दिली. त्यापेक्षा राहुलदादा किती तरी उजवे आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी राहुदादांशिवाय पर्याय नाही. पिंपरी चिंचवड शहरासारखा भ्रष्टाचार इतर कोणत्याही शहरात नाही. पिंपरी-चिंचवडचा पूर्वीचा नावलौकिक या सत्ताधाऱ्यांनी धुळीला मिळवला आहे असा थेट घणाघातही पाटील यांनी यावेळी केला.

विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल; राहुल कलाटेंसाठी सुप्रिया सुळे मैदानात

मनपा भ्रष्टाचारामुळे शहराची ओळख बदलली. टेंडर मॅनेज करणे, आमदार होणे म्हणजे मनपात वाटा मिळवणे अशी या सत्ताधाऱ्यांची समज झाली आहे. हे शहर म्हणजे पैसे खाण्याचे कुरण असे समजून शहरामध्ये अपप्रवृत्ती शिरल्या आहेत त्या अपप्रवृत्ती थांबवाव्या लागतील असंही आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केलं.

सर्वसामान्य जनतेवर घरपट्टी पासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा, श्रीमंतांना सूट पण गरिबांची कररुपी लूट, व्यापाऱ्यांना अटकेचा जाच, आजवरच्या इतिहासात रुपयाचे झालेले नीचांकी अवमूल्यांकन, हींजवडीतील आयटी कंपन्यानी घेतलेला काढता पाय या सर्व कारणांमुळे गेल्या दहा वर्षात आपण गुजरातच्या मागे पडलो. गुजरातमध्ये कंपन्यांचे स्थलांतर, देशावर २१० लाख कोटींचे कर्ज आहे, यावरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारही टीका केली.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, सविता दगडे, सुनिल गव्हाणे, तुषार कामठे, कैलास कदम, तुकाराम भोंडवे, इम्रान शेख, सागर तापकीर, दिनेश भोंडवे, ज्योती निंबाळकर, सचिन गायकवाड, अनिता तुतारे, वैशाली मराठे, देवेंद्र तायडे, अविनाश भालके, शिवाजी पाडुळे, मयूर जाधव, कौस्तुभ नवले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us