Shankar Mandekar : पुणे जिल्ह्यात अनेक मोठ्या लढती झाल्या. यात सर्वांत लक्ष्यवेधी लढत ठरली ती भोर वेल्हा मुळशी मतदारसंघाची. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संग्राम थोपटेंचा (Sangram Thopte) राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला. दरम्यान, निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मांडेकर (Shankar Mandekar) यांनी थोपटेंचा पराभव कसा केला? यावर भाष्य केलं.
अमोल कीर्तीकरांना धक्का! रविंद्र वायकरांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब, न्यायालयाचा मोठा निर्णय
2014 पासून आमदारकीसाठी इच्छूक…
मांडेकर यांनी विधानभवनाच्या बाहेर लेटसअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मांडेकर यांनी थोपटेंचा तब्बल 19 हजार 638 मतांनी पराभव केला. याविषयी बोलतांना मांडेकर म्हणाले की, 2014 पासून मी आमदारकीसाठी इच्छुक होतो. मात्र, तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही. 2019 ला देखील आमदारकीसाठी जोर लावला होता, मात्र तिकीट भेटलं नाही. तेव्हा आमची आघाडी असल्याने संग्राम थोपटेंना तिकीट भेटलं. मात्र, यंदा विधानसभा लढवायची याचा आम्ही चंगच बांधला होता. आणि जोरात तयारी केली. आपण निवडणूक येऊ, असा मला विश्वास होता. कारण, मी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असतांना आमच्या भागाचा चांगला विकास केला, असं ते म्हणाले.
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा, 2100 रुपये मिळणारच, सभागृहात फडणवीसांची ग्वाही
थोपटेंना माझ्या ताकदीचा अंदाज होता, पण…
थोपटेंनी हलक्यात घेतलं का, असा सवाल केला असता ते म्हणाले की, संग्राम थोपटेंना माझ्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. कारण, पंचायत समिती, झेडीवर असतांना ते माझी कामं पाहतच होते. पण, मांडेकरांना तिकीट मिळणार नाही, असं त्यांना वाटलं. शिवाय, सर्व नेतेमंडळी थोपटेंकडे होती. त्यामुळं तिकीट मिळालं तरी मी विजयी होणार नाही, असा त्यांचा समज झाला. मात्र, मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो.
जनतेच्या माझ्यावर विश्वास…
पुढं ते म्हणाले की, मी गेली 24 वर्षात सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत लोकांत असतो. लोकांच्या अडीअडचणी सोडवतो. मतदारसंघातील प्रत्येकाशी माझे जांगले संबंध आहे. तालुक्यातील जनतेचा माझ्यावर अन् माझा जनेतवर विश्वास आहे. बैलगाडा शर्यतीचे संघ, क्रिकेट संघ या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला विजयी केलं. 85 ते 80 टक्के मतदान मला मुळशीत झालं, असं मांडेकर म्हणाले.
..अन् आमदारकीचे स्वप्न पूर्ण झालं…
भाजपचे किरण दगडे हे आमदाकीसाठी इच्छुक होते. नंतर त्यांनी बंडखोरी केली. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, महायुतीकडून अनेकजण इच्छुक होते. दगडे हे शिवसेनेकडून इच्छुक होते. मात्र, जागा राष्ट्रवादीला सुटली आणि अजितदादांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. आजवर मी ज्या पदांवर काम केली, ती पदे दादांनीच देऊ केली. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. अजितदादांनी मला आमदारकीची तिकीट दिल्यानंतर अनेकांनी बंडखोरी केली. मात्र, नेत्याने एकदा तिकीट दिलं की निवडणूक येण्याची धमक पाहिजे आणि ते धमक माझ्यात होती. आज निवडणून आल्यानंतर अनेक वर्षांचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं, असंही मांडेकर म्हणाले.
थोपटेंनी अभिनंदन केल
मी निवडून आल्यावर अजितदादांनी फोन करून माझं कौतूक केलं. आणि निकाल लागल्यानंतर संग्राम थोपटेंनी देखील माझी गळाभेट घेऊन माझं अभिनंदन केल्याचं मांडेकर म्हणाले.
आता एमआयडीसाचा प्रश्न लावून धरणार आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि ग्रामीण भागातील विकासकामांसाठी प्रयत्न करून अजितदादांचा दादांचा विश्वास सार्थकी लावणार असल्याचं मांडेकर म्हणाले.