Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात एक वेगळेपण पहायला मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी थेट नाथपंथीय सांप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे जागृत कुंभमेळा तिर्थक्षेत्र असलेल्या पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात वज्रमूठ करत आढळराव यांना मोठे मताधिक्य देण्यासाठीचा निर्धार व्यक्त केला आहे.
Shirur Loksabha : आढळरावांकडे पाच तगडे आमदार… कोल्हेंचे काय होणार?
ब्रह्मनाथाच्या मंदिरात आढळरावांसाठी विजयश्रीचा हा संकल्प करुन सिद्धीस आणण्यासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, भाजपचे तालुका प्रमुख संतोष खैरे, आशाताई बुचके यांनी हातावर हात ठेवून वज्रमूठ केली.
विकासकामं करणं म्हणजे अॅक्टिंग करण्यासारखं नाही; आढळरावांनी कोल्हेंना डिवचले
सर्वाधिक लिड देण्यास कटिबद्ध
जुन्नर तालुक्यात झालेल्या वारुळवाडी,नारायणगाव,बुचकेवाडी, पारुंडे, सावरगाव,विठ्ठलवाडी, या सर्वच ठिकाणी आढळराव यांना मताधिक्य देण्याबाबतचा निर्धार महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.तर सर्वाधिक लिड जुन्नरमधून आढळराव यांना देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
आढळराव पाटलांचा झंजावती प्रचार
उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी झंजावती प्रचार सुरू केला आहे. त्यांना मतदारांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.त्यांनी
डोंगरगण टाकळेहाजी येथे, जीवनमित्र मेडिकल अध्यक्ष डॉ. हिरामण गबाजी चोरे व डोंगरगण ग्रामपंचायत सदस्य मोहनभाऊ चोरे यांनी आयोजित केलेल्या जय हनुमान सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त भेट दिली. नवं आयुष्य सुरु करणाऱ्या सहा नवविवाहित जोडप्यांना पुढील वैवाहिक आयुष्याकरीता आढळराव यांनी शुभेच्छा दिल्या.