Shivajirao Adhalrao Patil : मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही, असा घणाघात महायुतीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर केला आहे. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटलांनी आज अजित पवार गटात (Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमोल कोल्हेंवर घणाघात केलायं.
“वेळ पडली तर नाथाभाऊंकडे हक्कानं मत मागणार”; रक्षा खडसेंच्या वक्तव्याची चर्चा
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, अमोल कोल्हे यांचे मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादाबरोबर दोन दिवस एवढे पक्ष झाले आहेत. मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नसल्याचा घणाघात शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला आहे.
तसेच बैलगाडा, कांदा, शेतकरी प्रश्न, या मुद्द्यांवर अमोल कोल्हे यांच्यापेक्षाही जास्त वेळा मी लोकसभेत प्रश्न मांडले आहेत. पण मला डायलॉगबाजी करता येत नाही. संसदरत्न म्हणून गाजवतात मी सुद्धा दोन वेळा संसदरत्न पुरस्कार घेतले असल्याचंही शिवाजीराव आढळराव पाटील म्हणआले आहेत.
संसदरत्न पुरस्कार एक खाजगी कंपनी देते, त्याचा सरकारशी संबंध नाही. श्रीरंग बारणे यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यावरून ओळखा…..! मला त्यांच्यासारखी बच्चनगिरी करायला जमत नाही. येणारे निवडणूक आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठेची आहे भुलतापांना बळी पडू नका, असंही ते म्हणाले आहेत.
आधी लोकसभेचा प्रचार करा : फडणवीसांनी पाटलांना दटावले; ‘शब्दाविनाच’ करावे लागणार अजितदादांचे काम
अमोल कोल्हे हे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यानंतर शिरूरमध्ये महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू झाली. शिरूर लोकसभेची जागा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळं अजित पवारांनी कोल्हे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. याशिवाय शिंदे गटातून आलेले शिवाजी आढळराव पाटील हे या जागेवरून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांना पक्षप्रवेश देऊन अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करण्याचा अजित पवारांचा मानस आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढवली होती. दरम्यान, आता आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळदाव पाटील आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात आज अजित पवारांसह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान बोलताना शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार यांच्याबद्दल कौतुकास्पद भाष्य केलं आहे. ज्यांची धाडसीपणाने निर्णय घेण्याची क्षमता, विकासकामे करण्याची क्षमता, दिलेला शब्द काहीही झालं तरीही खाली पडू देणार नाही, असे अजित पवार असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हटलं आहे.