shocking details emerge about the Hinjewadi bus fire accident : पुण्यातून एक धक्कादायक आणि काळजाचा (Hinjewadi Accident) थरकाप उडवणारी घटना घडली समोर आली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली होती. त्यानंतर आता या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे या घटनेमध्ये चालकानेच ही बस पेटवली होती.
बस पेटवण्याचे कारण काय?
या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच ही बस पेटवून दिल्याच्या समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे कामगारांशी झालेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याचा राग त्याने अशा पद्धतीने बाहेर काढला आहे. त्याने कट रचून ही दुर्घटना घडवून आणली. असं पोलीस तपासात उघडकीस आले. त्याने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचं केमिकल गाडी जाणून ठेवलं. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडी ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटवून चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसमध्ये आगेचा भडक उडाला. असं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर या आरोपीने देखील या गुन्ह्याची कबुली दिली.
नेमकी घटना काय?
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने अख्ख्या वाहनाचा ताबा घेतला. समोरच्या बाजूचे कर्मचारी कसेतरी बाहेर पडले. पण आतील कर्मचाऱ्यांचे दुर्दैवच आडवे आले म्हणा, त्यांनी काही केल्या बाहेर पडता आलं नाही. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. समोरील दृश्य, जीव वाचवण्यासाठीची धडपड, वाहनाचा जळून झालेा कोळसा अन् भाजलेले कर्मचारी पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं.
दरम्यान, या अपघातातील मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटली आहे. या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण ( वय ४०) (सर्व मृत राहणार पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्यांचा मृत्यू चटका लावणाराच आहे. पण, या वाहनाला आग लागली तरी कशी? या टेम्पो ट्रॅव्हलरचे मेंटेनन्स झाले नव्हते का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी आणि टेम्पो चालक जनार्दन हंबारडीकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.