Download App

पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा

Mayuri Jagtap On Vaishnavi Hagawane Death : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) चर्चेत

Mayuri Jagtap On Vaishnavi Hagawane Death : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) चर्चेत आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणे (वय 23) (Vaishnavi Hagawane) यांनी सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे (Shashank Hagawane) , सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना केली आहे. तर दुसरीकडे आता हगवणे कुटुंबियांचे कारनामे समोर येत आहे. हगवणे कुटुंबाची मोठी सुन मयुरी जगताप यांनी देखील हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे.

हगवणे कुटुंबियांकडून मोठी सून मयुरीला देखील मारहाण करण्यात येत होती असा धक्कादायक खुलासा स्वत: मयुरीने केला आहे. माध्यामांशी बोलताना पती घरी नसताना दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण करण्यात आली होती असा धक्कादायक खुलासा मयुरी जगताप यांनी केला आहे.

माध्यामांशी बोलताना मयुरी जगताप (Mayuri Jagtap) म्हणाल्या की, आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे त्यांनी मला योग्यवेळी माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिली. हगवणे कुटुंब कोणत्याही थराला जाऊ श      कतात याची जाणीव माझ्या पतीला होती. त्यामुळे त्यांनी मला माहेरी आणून सोडले असा खुलासा माध्यमांशी बोलताना मयुरी जगताप यांनी केला.

तर सासरा, सासू, नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला त्राल देण्यात येत होता असा खुलासा देखील त्यांनी केला. तर वैष्णवीचा पती शशांकला महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या आणि माझ्या सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितली आपण स्वत: ऐकल्याचा दावा देखील मयुरी जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केला.

All New Tata Altroz ची बाजारात धमाकेदार एंट्री; स्टायलिश लूकसह किंमत फक्त 6.89 लाख रुपये

तर दुसरीकडे अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकलपट्टी केली आहे. पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

follow us