Shrinivas Pawar Criticize Ajit Pawar : सध्या देशभरात लोकसभेची धामधूम सुरू असून, राजकीय पक्षांची नजर महाराष्ट्रावर आणि त्यातील बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे. याचं कारणही खास असून, येथून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्यामध्ये एकीकडे संपुर्ण पवार कुटुंब तर दुसरीकडे अजित पवार एकटे अशी ही लढत आहे. त्यात आता एका वाहिनीला मुलाखत देताना अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार ( Shrinivas Pawar ) यांनी अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढण्याबाबतच्या वक्तव्यावरून खोचक सल्ला दिला आहे.
आयडियाची कल्पना फेम क्षितिज झरापकर यांचे निधन, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
यावेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, अजितदादा शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मिशा काढण्याबाबत केलेलं वक्तव्य लक्षात ठेवावं. कारण निवडणुका झाल्यानंतर ही रणजित पवार आणि राजेंद्र पवार हे येथे बारामतीतच असणार आहेत. ते इथेच राहतात. त्यामुळे अजितदादांनी ते वक्तव्य सर्वांसाठी केलं असेल तर त्यांनी लगेचच मिशा काढल्या पाहिजे. त्यासाठी उद्याची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांना अजित पवारांच्या मिशा काढण्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते बोलत होते.
हक्काच्या मैदानावर पाणी! 50 वर्षांत प्रथमच शरद पवारांच्या सभेचं मैदान बदललं
त्यामुळे ते चुकीच बोलले आहेत. त्यांच्यावर खरचं तशी मिशा काढण्याची वेळ येणार आहे. तसेच यावेळी अजित पवार आणि कुटुंब पुन्हा एकत्र येणार का ? यावर श्रीनिवास पवार म्हणाले की, कुटुंब कधीच वेगळं होत नसत. त्यामुळे ते एकत्र येणार हे निश्चित आहे. असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंब एकत्र येणार असल्याचे संकेत देत सुप्रिया सुळे यांनी आपला पाठिंबा असणार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार म्हणाले होते की, गेल्या पाच वर्षांमध्ये बारामती तालुक्यातील सर्वाधिक रस्त्यांची कामं झाली. जी काही थोडीफार राहिली आहेत. ती देखील आपणच करणार. दुसरे कोणीही करणार नाही. ते फक्त प्रचारासाठी येतात. सात तारीख होऊ द्या त्यातील एक जण जरी तुम्हाला भेटायला आला. तर मी मिशी काढून देईल. कारण त्यांना काहीही पडलेले नाही. ते म्हणतील आम्हाला आमचा धंदा आहे. गाड्या विकायच्या आहेत. आमच्या शोरूमचा कोण बघणार? आमच्या ऍग्रो चा कोण बघणार? कर्जत जामखेड कोण बघणार? अशी या सर्वांची नौटंकी आहे. ते सर्वजण माझ्या घरातलेच आहेत. पण सध्या त्यांच्या तोंड जास्त वळवळ करत आहेत.