आयडियाची कल्पना फेम क्षितिज झरापकर यांचे निधन, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Kshitij Zarapkar Passed Away : मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक असलेले क्षितिज झरापकर ( Kshitij Zarapkar ) यांचे निधन झाले ( Passed Away ) आहे. कर्करोग तसेच विविध अवयव फेल झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांनी वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
हक्काच्या मैदानावर पाणी! 50 वर्षांत प्रथमच शरद पवारांच्या सभेचं मैदान बदललं
यावर ते 3 मे पासून दादर येथील सिम्बॉयसिस रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. मात्र अखेर त्यांची मृत्यूची झुंज व यशस्वी ठरली आहे. झरापकर यांचे पार्थिव दुपारी दोन वाजता दादर येथील त्यांच्या राहत्या घरी अंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी तीन नंतर दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Champions Trophy साठी पाकिस्तानला न येण्याचे परिणाम भोगावे लागणार; माजी क्रिकेटपटूचा भारताला इशारा
क्षितिज झरापकऱ्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर एकूलती एक तसेच आयडियाची कल्पना यासारख्या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच लेखन आणि दिग्दर्शन या क्षेत्रातही त्यांनी आपले नशीब आजमावलं होतं. त्यानंतर ते आता अस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या चर्चा तर होणारच नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.