Smriti Irani : पुण्यात आज ‘दो धागे श्रीराम के लिए’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते करण्यात येणार होतं. या कार्यक्रमाला स्मृती इराणी यांनी हजेरी लावली पण त्यांचा हिरमोड झाला. कार्यक्रमाला मोजकेचं लोकांनी हजेरी लावल्याने इराणी यांनी कार्यक्रम सोडून निघून गेल्या आहेत.
फडणवीस काड्या करत राहिले तर आम्ही डाव उधळणार; जरांगेंनी डायरेक्ट धमकावलंच
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम येत्या १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ रविवार १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर पार पडणार होता.
ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास होणार ‘गारेगार’: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
मात्र ‘दो धागे-श्रीराम के लिए’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रम सोडून निघून गेल्या. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं त्या मंचावर गेल्याचं नाहीत, उलट त्यांनी कार्यक्रम मध्येच सोडून जाणं पसंत केलं. पुण्यातील मॉडेल महाविद्यालयाच्या मैदानावर हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी स्मृती इराणी यांनी एफसी रोडवर ‘दो धागे, श्रीराम के लिए’ या कार्यक्रमाच्या पहिल्या कार्यक्रमाला हजेरी लावत या उपक्रमासाठी आणि प्रभू श्रीरामसाठी वस्त्र देखील विणलं.
रणवीरनंतर आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने केले न्यूड फोटोशूट; म्हणालो ‘मी 7-8 दिवस एकटाच..’
त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांना स्मृती इराणी संबोधित करणार होत्या. मात्र, कार्यक्रमाला बोटावर मोजण्याइतकेचं माणस होती., कार्यक्रमात अक्षरश: रिकाम्या खुर्च्या पाहून इराणी मंचावर गेल्याचं नाहीत. उलट त्यांनी हा कार्यक्रममध्येच सोडून जाणं पसंत केलं आहे. यावर बोलताना आयोजकांनी स्मृती इराणी यांचे मुंबईत पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने त्या निघून गेल्या असल्याचं आयोजक अनघा घैसास यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, इथल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार नव्हतं असल्याचं सांगितलं आहे मात्र, स्मृती इराणी यांच्या दौऱ्यामध्ये मॉडन कॉलेजचा कार्यक्रम देखील नियोजित होता. या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.