महिलांनीच दोन महिलांना मारहाण करत केलं विवस्त्र; स्मृती इराणींचा तृणमूलवर हल्लाबोल
Manipur Violence : मणिपूर येथे जातीय हिंसाचारात दोन महिलांना विविस्त्र केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अशात आता पश्चिम बंगालमधूनही एक खळबळजनक घटना समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात काही महिला दोन महिलांना बेदम मारहाण करून अर्धनग्न करत असल्याचं दिसून येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली आहे. अद्याप पश्चिम बंगाल पोलिसांकडे याबाबतची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. (West Bengal, some women brutally beat up two women and stripped them half naked)
मिळालेल्या माहितीनुसार, मालदा येथील पकुहाटमध्ये स्थानिक लोकांनी दोन महिलांना चोरीच्या आरोपाखाली रंगेहात पकडलं आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण करताना महिलाच पुढे असल्याचं दिसून येत आहे. मात्र, पश्चिम बंगाल पोलिसांच्या मते, त्यांच्याकडे अशी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतरच या घटनेची माहिती मिळाली असा पोलिसांचा दावा आहे. चोरी करताना पकडलेल्या महिलाही पळून गेल्याने मारहाण करणाऱ्या महिलांनीही भीतीपोटी तक्रारही दिली नाही. परंतु आता सुमोटो गुन्हा दाखल केला जाईल आणि तपास केला जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.
Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!
हावडा येथूनही असंच एक प्रकरण आलं होतं समोर :
यापूर्वी पश्चिम बंगालमधील हावडा येथूनही अशीच एक घटना समोर आली होती. बंगाल पंचायत निवडणुकीतील एका महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. 8 जुलैला विवस्त्र करुन तिचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत संबंधित महिलेने ईमेलद्वारे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी, एका महिलेची तक्रार ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. 8 जुलै रोजी हेमंत रॉय आणि इतरांनी तिला जबरदस्तीने मतदान केंद्राबाहेर नेले, तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. परंतु तपासादरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी 8 जुलै रोजी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगितलं आहे. तसंच याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Shiv Thakare: वीणा जगतापबद्दल शिव ठाकरेचं मोठं विधान; म्हणाला, ‘तिच्या डोळ्यात अश्रू…’
स्मृती इराणी यांचा तृणमूल सरकारवर हल्लाबोल :
दरम्यान, या दोन्ही प्रकरणांवरुन केंद्रीय मंत्री स्मृती यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. स्मृती इराणी म्हणाल्या की राज्यात दोन महिलांना विवस्त्र केले जाते परंतु सत्ताधारी तृणमूलने अद्यापपर्यंत कोणतेही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. किंवा काँग्रेसनेही कोणतेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. त्या म्हणाल्या की, राजस्थानचे मंत्री राजेंद्र गुडा यांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, मणिपूरपेक्षा राजस्थानमध्ये अधिक महिलांचा छळ होत असल्याचे तुमचे मंत्री स्वतः सांगत आहेत. पण काँग्रेसने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई न करता अशोक गेहलोत त्या मंत्र्यांनाच बडतर्फ केले. याशिवाय सरकारला मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा हवी होती, पण विरोधकांनी नकार दिल्याने मला आश्चर्य वाटते, असा दावाही इराणी यांनी केला.