Shiv Thakare: वीणा जगतापबद्दल शिव ठाकरेचं मोठं विधान; म्हणाला, ‘तिच्या डोळ्यात अश्रू…’
Shiv Thakare Ex Girlfriend: शिव आणि वीणा हे ‘बिग बॉस मराठी’ सीजनच्या काळात सर्वांचे आवडते कपल होते. परंतु आज हे दोघे वेगळे झाले असले तरी कायम एकमेकांना पाठींबा देत असताना दिसून येत असतात. छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) हा कार्यक्रम आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ३ सीजन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत.
View this post on Instagram
त्यामध्ये सर्वच सीजन चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसऱ्या सिजनमध्ये सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि वीणा जगतापची (Veena Jagtap). शिव आणि वीणा यांना एकत्र बघायला चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असायचे. परंतु जेव्हा त्यांचा ब्रेकअप (break up) झाला, तेव्हा सर्वांनाच वाईट वाटले होते. (Social media) काही चाहत्यांनी शिवला याबद्दल चांगलेच सुनावले होते. आता शिवने यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
शिवने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, “उगाच कोणत्याही गोष्टी होत नसते. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल जाहीरपणे सोशल मीडियावर बोलत असता, त्यानंतर उगाच होत नाही. कारण तुम्ही भूतकाळात काही गोष्टी केल्या असतात. तुमच्यासाठी तो बाँड, ते नाते खूप महत्त्वाचे असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. तसेच ते नाते संपल्यानंतर देखील समोरच्याला इजा न होऊ देता तुम्ही ते कसे जपता हे महत्त्वाचे आहे. कारण तो बाँड आणि ते नाते तुमचे होते. तुमच्या फॅमेलेची नाही. काही गोष्टी अशा आहेत की, ते फक्त आमच्या दोघांना माहीत आहेत.
Swanandi Tikekarच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी; फोटो शेअर करत म्हणाली, “आम्हाला जे…”
आमच्या कुटुंबाला आणि लोकांनाही माहिती नाही. त्या गोष्टी मी जशा हाताळायला हव्या होत्या तशा मी हाताळले आहेत. तसेच पुढे शिव रिअॅलिटी शोबद्दल बोलत असताना म्हणाला की, “सिनेमा म्हटले की एक कॅरेक्टर प्ले होत असते, परंतु रिअॅलिटी शो म्हटले की, तिथे तुम्ही स्वतः दिसून येत असता. यामुळे काही गोष्टी घडतील, असा मला अंदाज होता. मी तेवढा स्ट्राँग आहे की, माझ्या बाँडसाठी उभा राहनार आहे. तो कसा जपायचे आहे हे मला चांगलच माहीत आहे.
कारण मी तो आतापर्यंत जपल्याचे दिसून आले आहे. समोरची व्यक्ती माझ्या बरोबर असूदे नसूदे मला तिच्या डोळ्यामध्ये कधीही अश्रू यायला नकोय. सोशल मीडियावर लोकांना काही गोष्टी माहीत नसतात. परंतु मी त्यांना गप्प करण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशा पद्धतीने सांभाळले जाईल किंवा दोन्ही कुटुंबाला कसे सांभाळले जाणार याचा मी नेहमी विहार करत असतो.