Download App

Baramati : युग्रेंद्र पवार फिक्स आमदार तर सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री; बारामतीत झळकलं बॅनर

विधानसभेच्या तोंडावर सर्वांनाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे. अनेक पक्षाच्या कार्यकर्ते त्या भावना बॅनरच्या माध्यमातून मांडतात.

  • Written By: Last Updated:

Supriya Sule CM Banner een Baramati : विधानसभेच्या तोंडावर सर्वांनाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे. अनेक पक्षाच्या कार्यकर्ते त्या भावना बॅनरच्या माध्यमातून मांडतात. अशातच बारामतीत (Baramati ) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री (Supriya Sule ) म्हणून तर युगेंद्र पवारांचा फिक्स आमदार म्हणून बॅनर लागला आहे. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Video : मी देखील उत्तर देऊ शकते.. सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी घोषणाबाजी, गडकरी अन् फडणवीसांची मध्यस्थी

 गुणवडी चौकात लागले बॅनर 

बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेलं आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेलं आहे. बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्यात बरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपलाच नेता मु्ख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशी नावे चर्चेत आहेत. या सर्वांत जर कोणी शांत असतील तर ते नाव आहे शरद पवार यांचे. त्यांनी अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचे आपले पत्ते खोलले नाहीत.

आजपासून पावसाचे धुमशान! या जिल्ह्यांत जोरदार बरसणार; वाचा हवामानाचा अंदाज

सुप्रिया सुळेंसाठी मोकळे मैदान

आधी महायुतीची सत्ता घालवू मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, जर महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकतात अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे निवडून येणारे बहुतांशी आमदार हे नवखे असणार आहेत. त्यामुळं सुप्रिया सुळे अशा आमदारांचं समर्थन मिळवू शकतात. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचा वरचष्मा होता. आता तशी स्थिती नाही. सुप्रिया सुळेंसाठी मोकळे मैदान आहे. शिवाय पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करतील अशी स्थिती सध्या तरी नाही.

follow us