Download App

Supriya Sule : “दमदाटी केली तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला खणखणीत इशारा

Supriya Sule : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. यंदा बारामती मतदारसंघाची जास्त चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच असतील (Supriya Sule) हे स्पष्ट आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी सुनेत्रा पवार निवडणूक लढतील असे सांगण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी तर प्रचाराला सुरुवातही केली आहे. आताही त्यांनी अजित पवार गटाला खणखणीत इशारा दिला आहे. बारामती मतदारसंघ माझा आहे. माझ्या मतदारसंघात कुणी दमदाटी केली तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा सुळे यांनी दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या दिल्या तर मी ढाल बनून उभी राहिन, असेही सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : अतिथी देवो भव: ! मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीत मी स्वागत करणार

सुळे पुढे म्हणाल्या, बारामती मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुठेही कार्यकर्त्यांना धमकी दिली तर सांगायचं आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल. कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशांची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असे हल्ले एकमेकांवर करतात. हर्षवर्धन पाटील यांना शिवीगाळ केली ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असा सवाल सुळेंनी केला. एका मित्रपक्षाचा नेता दुसऱ्या मित्रपक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो. हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे सांगावं लागलं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘त्या’ पत्रात नेमकं काय ?

काही दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम करत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.

तसेच मला तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देखील दिली जात आहे. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत असून ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्यात यावी. त्यात आपण तात्काळ लक्ष घालावं आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा. याबाबत आपण ठोस भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती या पत्राद्वारे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

‘खबरदार, माझ्या वडिलांचा एकेरी भाषेत उल्लेख केला तर’ हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा मित्रपक्षांना इशारा

 

follow us