Download App

‘सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा अन्…’; पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ठराव

सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

  • Written By: Last Updated:

Sunetra Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाचा पराभव झाला. शरद पवारांनी पुन्हा बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे.

Government Schemes : वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला घेता येईल? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन पुणे शहरातील पक्ष कार्यालयात
पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी हा सुनेत्रा पवारांना राज्यभेवर पाठवा, असा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला आणि पारित झाला. या ठरावामध्ये सुनेत्रा पवारांना राज्यभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल, असं म्हटलं.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंब विभक्त झालं. मूळ राष्ट्रवादी अजित पवारांकडे गेली. तर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थापन करून ते लोकसभेला सामोरे गेले. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी विजय संपादन करत चौथ्यांदा खासदार झाल्या. सुळेंनी 1 लाख 53 हजार 960 मतांनी विजयी मिळवत अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा दणदणीत पराभव केला.

दरम्यान, पराभवामुळे सुनेत्रा पवारांचे दिल्लीत जाण्याचं स्वप्न अधुरे राहिले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळेच आज की आज पुण्याच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला.

भाजपची वाढती ताकद रोखण्यासाठी हवंय मंत्रिपद
पुण्यातील भाजपची वाढती ताकद आणि मोहोळांना मंत्रिपद मिळणं यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. त्यामुळं आता अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाऊन मंत्री होणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज