Tamhini Ghat : आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसाने रायगड-पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट खचला आहे. (Rain) ताम्हिणी घाट खचल्याने दुरुस्तीसाठी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे.
वायनाडनंतर हिमाचलमध्ये 47 लोक बेपत्ता; देशावर अस्मानी संकट, उत्तराखंडमध्येही भूस्खलनाची घटना
पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात रस्ता एका बाजूने खचला आहे. या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणं धोकादायक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदचे निर्देश दिले आहेत.
मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचलेला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता 5 ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.