वायनाडनंतर हिमाचलमध्ये 47 लोक बेपत्ता; देशावर अस्मानी संकट, उत्तराखंडमध्येही भूस्खलनाची घटना
Himachal Landslide : केरळमधील वायनाडमध्ये गेल्याच आठवड्यात झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 300 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. या दुर्दैवी घटनेनंतर आता असंच संकट हिमाचल प्रदेशात आलं आहे. (Landslide) ढगफुटीमुळे आणि पुरामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशात 47 लोक अजूनही बेपत्ता आहेत. काल दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या सात झाली आहे.
video: काळीज पिळवटून टाकणारी दृष्य; आम्हाला वाचवा, वायनाड भूस्खलन दुर्घटेतील लोकांची आर्त हाक
बचावकार्यात गुंतलेल्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि होमगार्ड यांना स्थानिक लोक मदत करत आहेत. केंद्र सरकारने पाठवलेले चिनूक आणि MI-17 हे विमानही उत्तराखंडमधील बचाव कार्यात सामील झाले आहेत. सध्या देशातील अनेक भागांत पूर आणि ढगफुटीमुळे मोठं सकट निर्माण झाले आहे.