ब्रेकिंग न्यूज; देशाला हादरवून सोडणाऱ्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक या दोघांनाही सेवेतून बडतर्फ करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय

Untitled Design (80)

Untitled Design (80)

Two police officers dismissed in Porsche car accident case : देशाला हादरवून सोडणाऱ्या पुणे पोर्शे (Porche) कार अपघात प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. येरवडा पोलीस(Yerwada Police)  ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांनाही सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातल्या (Pune) कल्याणीनगर(Kalyaninagar) परिसरात 19 मे 2024 रोजी 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या कारने दुचाकीस्वारांना धडक दिली होती. यात घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल(Vishal Agarwal) यांच्या मुलाने दारूच्या नशेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या 2 जणांना पोर्शे गाडीने उडवला होतं. या प्रकरणातला धक्कादायक प्रकार म्हणजे आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. पोलिसांनी देखील या प्रकरणात आरोपीला मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. पुण्यातील या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट पसरली होती.

पुण्यात भाजप निष्ठवंतांची डोकेदुखी वाढणार! मनपा निवडणुकीसाठी इतर पक्षांतील इच्छुकांचीच गर्दी

आता या प्रकरणाला जवळपास वर्ष पूर्ण होत असतानाच राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंद भोसले या दोघांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले. प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहोचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रूमला न कळवळ्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गृहखात्याने या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे.

आरोपीने जेव्हा गुन्हा केला तेव्हा तो 17 वर्षे 8 महिन्यांचा होता. त्याला प्रौढ होण्यासाठी फक्त चार महिने बाकी असल्याने त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र दुसरीकडे बाळ न्याय मंडळाने अवघ्या 14 तासांत या आरोपीला 100 शब्दांचा निबंध लिहायला सांगून जमीन मंजूर केला होता. ज्यामुळे देशभरातुन संताप व्यक्त केला जात होता.

Exit mobile version