Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. हगवणे कुटुंबियांकडून झालेल्या माणसिक आणि शारीरिक धळाला कंटाळून वैष्णवी (Vaishnavi Hagawane Case) हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता यांना अटक केली आहे तर 23 मे रोजी सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप (Mayuri Jagtap) हिने देखील धक्कादायक माहिती दिली होती तर आता हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. माहितीनुसार, या कुटुंबाने बैलासाठी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, एप्रिल 2023 मध्ये या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. हगवणे कुटुंबाच्या या कार्यक्रमात स्टेज जवळ फक्त बैल उभा होता आणि स्टेजवर गौतमी पाटील नाचत होती. माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी वैष्णवीचा दीर सुशीन हगवणे याने भला मोठा स्टेज बांधला होता. जिथे गौतमी पाटील नाचत होती. तर तिच्यामागे स्टेजवर सुशील हगवणे यांचा मोठा फोटो आणि नावंही झळकलं होतं. हुंड्यासाठी ज्या घरात दोन्ही सुनांना मारलं जातं होते, त्यांचा धळ करण्यात येत होते त्याच घरात बैलाच्या वाढदिवसाठी चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला जातो हे मात्र विशेष आहे.
मोठी बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा
तर दुसरीकडे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींवर मकोका लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे. 23 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेत या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज भारतीय क्रिकेटसाठी मोठा दिवस; नवीन कसोटी कर्णधाराची होणार घोषणा