Download App

Vaishnavi Hagawane Case : ब्रेकिंग! सासरा राजेंद्र हगवणे अन् दीर सुशीलच्या मुसक्या आवळल्या…

बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी पहाटेच्यादरम्यान अटक केलीयं.

Vaishnavi Hagawane Case : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पहाटेच्या दरम्यान, पुणे पोलिसांनी एका खेडेगावातून अटक केलीयं. मागील सात दिवसांपासून हे दोघेही बापलेक फरार होते. अखेर शुक्रवारी पहाटे त्यांना अटक केलीयं.

पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली. गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय.

पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा

शुक्रवारी वैष्णवी हगवणे हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच वैष्णवीचे वडील आनंद उर्फ ​​अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली, असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.

वेळ अन् पद्धत आमचं सैन्य ठरवणार! PM मोदींचा पाकिस्तानला उघड इशारा, दहशतवादाविरोधात भारताची त्रिसूत्री

वैष्णवी हगवणेच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असू शकतो, अशी शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या शवविच्छेदन अहवालामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. वैष्णवीने आत्महत्या केली का? की, तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झालेत. या घटनेप्रकरणी वैष्णवीची सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील सात दिवसांपासून फरार होते. या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक तपास करीत होतं. अखेर आज पहाटेच्या सुमारास एका छोट्याशा खेडेगावातून दोघांना अटक करण्यात आलीयं.

follow us