Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींकडून मानसिक छळाला कंटाळून छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. वैष्णवीच्या आत्महत्येला (Vaishnavi Hagawane) तिच्या सासरची मंडळीच कारणीभूत असल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना केलायं. या प्रकरणी आरोपी सासू आणि नंदेला पोलिसांकडून अटक केली तर मागील सात दिवसांपासून आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी पोलिसांनी आज अखेर अटक केलीयं.
हगवणे बाप-लेकाचा मटनावर ताव…
बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यूला कारणीभूत ठरलेला फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पोलिसांनी अखेर अटक केलीयं. सुनेच्या मृत्यूनंतरही बाप-लेक हॉटेलमध्ये मटनावर ताव मारत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत.#vaishnavihagawane #punenews pic.twitter.com/6SKivHHMb5
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 23, 2025
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांची कालच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अजितदादांना आक्रमक भूमिका घेत दोघांनाही न सोडण्याचा इशारा दिला होता. बावधन पोलिसांनी सापळा रचून बापलेकाला बेड्या ठोकल्या आहेत. मागील सात दिवसांपासून आरोपी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. एका खेड्या गावात ते लपून बसले होते. विशेष म्हणजे राजेंद्र आणि सुनिल हे दोघेही बापलेक एका हॉटेलमध्ये जवतानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले.
नगरच्या भूमिपूत्र जम्मू काश्मीरमध्ये शहीद, दहशतवादविरोधी मोहिमेत प्राणाची आहुती…
आपल्या सुनेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतरही हे फरार आरोपी तळेगावातील एका हॉटेलमध्ये मटनावर ताव मारत होते. पोलिसांनी हाती सीसीटीव्ही फुटेज येताच त्यांनी तातडीने आपले सुत्र हलवले. आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केलीयं. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबातील आत्तापर्यंत पाच जण अटकेत आहे. यामध्ये वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना याआधीच अटक करण्यात आलीयं. काल रात्री राजेंद्र यांचा भाऊ संजय हगवणे यालाही ताब्यात घेण्यात आले.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर निलेश चव्हाण याच्यावरही अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कस्पटे यांना धमकवण्याचा, आणि बाळ पळवण्याचा आरोप आहे. दरम्यान, बावधन पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली असून त्यांना पोलीस उपायुक्त कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.