Download App

Vijay Shivtare निवडणूक लढवण्यावर ठाम; अपक्ष म्हणून अर्ज भरणार, 1 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार

Vijay Shivtare : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

Sujay Vikhe यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी मैदानात; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

दरम्यान शिवतारे यांनी युतीधर्म पाळण्यासाठी ही निवडणूक लढवू नये असं एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी त्यांच्याशी शिंदेंनी दोनदा चर्चा देखील केली. मात्र शिंदेंच्या विरोधात जात आपण 12 एप्रिलला अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं आज  24 मार्च ) शिवतारे यांनी जाहीर केलं. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आपला हा निर्णय पत्रकार परिषद घेत जाहीर केला.

‘नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं’; उदयनिधी स्टालिन यांचे वादग्रस्त वक्तव्य

यावेळी बोलताना शिवतारे यांनी सांगितलं की, ही निवडणूक मी लढणारच आहे. मला जनतेचा आशीर्वाद आहे. काही छुपे आशीर्वाद आहेत. कारण नेते देखील माणसंच आहे. त्यांना देखील न्याय अन्याय कळतो. स्वतःला काही करता येत नसेल तर कोणी करत असेल त्याला मदत करावी एवढी सद्सद विवेक प्रत्येकालां आहे.

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सव, मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्यासाठी आम्ही पुढचं पाऊल उचलला आहे एक एप्रिलला माऊलींच्या पालखीतळावर आम्ही प्रचारासाठी पहिली सभा घेणार आहोत. तसेच त्यानंतर 12 एप्रिलला दुपारी बारा वाजता मी माझ्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यानंतर मला निवडणूक चिन्ह मिळेल. ते चिन्ह जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मी सहाही मतदारसंघ पिंजून काढणार आहे. असं म्हणत शिवतारे यांनी आपल्या आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे.

त्यामुळे आता आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें, सूनेत्रा पवार आणि विजय शिवतारे अशी तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंमुळे अजितदादा अडचणीत येऊन चेकमेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us