Download App

Video : तीन ठिकाणचा ताबा द्या, अन्य मशिदींकडे बघणारही नाही! गोविंददेव गिरी महाराजांचा मोठा दावा

पुणे : अयोध्येनंतर आता काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांतेमध्ये मिळाली पाहिजेत. आम्हाला इथल्या वास्तू मिळू द्या, त्यानंतर अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारच नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर समजुतीने तीन ठिकाणे आम्हाला द्या. आम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी विसरुन जाऊ, असा दावा श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी (Govind Dev Giri Maharaj) महाराज यांनी केला. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोविंददेव गिरी महाराज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चार ते 11 फेब्रुवारी दरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातीच एका कार्यक्रमासाठी ते आळंदीमध्ये उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आणि इतरही सहभागी झाले होते. (We do not even desire to look at the other temples if three temples are freed said Treasurer of Sri Ram Janambhoomi Trust Govind Dev Giri Maharaj)

ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कर्तव्यातील कसुरी भोवली

याच दरम्यान ते म्हणाले, अयोध्येनंतर काशी आणि मथुरा ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांतेत मिळाली पाहिजेत. त्यानंतर मंदिरांसंबंधित सगळे वाद-विवाद आम्ही बाजूला ठेऊ. आम्हाला तीन ठिकाणच्या वास्तू मिळू द्या, अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारही नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले होण्याची इच्छा असेल तर समजुतीने तीन ठिकाणे आम्हाला प्रेमाने द्या, आम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी विसरुन जाऊ.

“कोण आला रे कोण आला… कल्याणचा वाघ आला…” : भाजपच्या शूटर आमदारांसाठी घोषणा, कार्यकर्ते अडचणीत

अयोध्येचाा प्रश्न सुटला, काशी, मथुरा बाकी :

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परंतु सध्या मंदिराचे बांधकाम सुरू असून या डिसेंबरपर्यंत बांधकाम पूर्ण होईल. याशिवाय ज्ञानवापी आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

follow us