Download App

Kasba By Election : ब्राम्हण समाजाची काय भूमिका? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. कसबा पेठेतील ब्राम्हण समाज नाराज नसून नाराज असल्याचं विरोधकांकडून पसरवलं जात असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांनी उमेवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून लावण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री शिंदें यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, कसबा पेठेतील अनेक समाजाचे लोक मला येऊन भेटले आहेत. यामध्ये विशेषत: तेली समाज, मराठा समाज, सोनार समाज , ब्राम्हण समाज असे अनेक समाजाचे लोक येऊन भेटत आहेत. भेटीत त्यांनी अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले आहेत. त्यामध्ये कसब्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न अशा प्रश्नांचा समावेश असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

Dhananjay Munde : कंपन्या गुजरातला पळवल्या… आता देव पळवतात

कसबा पेठ हा मतदारसंघा गेल्या अनेक वर्षांपासून युतीचा बालेकिल्ल्या असून निवडणुकीत कोणाला विजयी करायचं ते मतदार ठरवत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेतय, त्यामुळे लोकांना विश्वास निर्माण झालाय की हेच सरकार काम करत आहे.

कांद्याला अग्निडाग! राजकारण्यांना अनोखं निमंत्रण, निमंत्रण पत्रिका व्हायरल

दरम्यान, मुक्ता टिळकांनंतर भाजपने ब्राम्हण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी सातत्याने ब्राम्हण समाजाकडून करण्यात होती. अखेर ब्राम्हण समाजाला उमेदवारी न मिळाल्याने हिंदु महासंघाचे आनंद दवे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ब्राम्हण समाजावर भाजपने अन्याय केल्याचा आरोप करत आनंद दवे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं दिसतंय.

फडणवीस अन् पवारांचं राजकारण कसं? Sambhaji Raje Chhatrapati यांनी स्पष्ट सांगितलं

कसबा पेठ निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी दोन्ही पक्षांकडून कंबर कसली असली असून कसब्याच्या जागेसाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते कसब्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय.

Tags

follow us